नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक लोक वाटेल ते करतात. अशीच एक घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. आपल्या गर्लफ्रेंडला अधिकारी करण्यासाठी दहा हजाराची साधी नोकरी करणाऱ्या एका बॉयफ्रेंडने तब्बल 1.75 कोटींवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या प्रेमासाठी तो चक्क चोर झाला आणि त्याने ऑफिसातून 1.75 कोटी लंपास केले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. न्यू सिटी लाइट भागातील एका बिल्डरच्या ऑफिसात तब्बल 1 कोटी रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणात क्राइम ब्रान्चच्या टीमने बुधवारी मध्य प्रदेशमधून दोन भावांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरीची घटना 10 ऑक्टोबर रोजी घडली होती. एका बिल्डरच्या ऑफिसमधून 90 लाखांची चोरी झाली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घराच्या मागील बाजूला शेतात त्यांनी 98.8 लाखांची रोख रक्कम खड्डा खणून पुरली होती. पोलिसांनी अलीपूर जिल्ह्यात असलेल्या आरोपीच्या घराजवळून ही रक्कम जप्त केली आहे. या भावांनी तब्बल 1.75 कोटींची चोरी केली आहे. मात्र तक्रार दाखल करताना पीडित व्यक्तीला लॉकरमध्ये ठेवलेल्या रकमेची माहिती नव्हती.
गर्लफ्रेंडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केली चोरी
चोरांकडून अद्यापही 76 लाख रुपये मिळालेले नाहीत. आरोपीने काही पैसे आपल्या प्रेयसीच्या वडिलांनाही दिले आहेत. सूरत पोलिसांनी या प्रकरणात एमपाल मंडलोई पटेल आणि त्याचा भाऊ नेपाल यांना अटक केली असून दोघांनी घराजवळ पैसे लपवून इंदूरमध्ये राहायला गेले होते. काही मीडिया रिपोट्सनुसार, आरोपी एका शिक्षित तरुणीवर प्रेम करीत होता. तिला मोठं अधिकारी व्हायचं होतं. तिच्या तयारीसाठी पैशांची गरज होती. गर्लफ्रेंडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमपालने चोरी केली.
बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडसाठी लंपास केले 1.75 कोटी
पोलिसांना त्याने सर्व घटना सांगितली असून या प्रकरणात तपास सुरू आहे. एमपाल मंडलोई वेस्टर्न कंस्ट्रक्शनच्या कार्यालयात ऑफिस बॉयची नोकरी करीत होता. तो कॅश कुठे ठेवली जाते याकडे लक्ष देत होता. लॉकरच्या चाव्या कुठे आहेत हे देखील त्याला माहिती झालं होतं. संधी साधून त्याने कार्यालयातच चोरी केली. आरोपीने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्लफ्रेंडच्या वडिलांनी मुलींच्या शिक्षणासाठी 5 लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्यासाठी त्याने चोरी केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.