शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

महिला डॉक्टर आणि तरुणाला ऑनलाईन गंडा, मेंबरशीप, टीव्ही बुकींग करणे महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 6:50 PM

याप्रकरणी अनुक्रमे एमआयडीसी व रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव - ऑनलाईन व्यवहार करणे महिला डॉक्टर व एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. कुरीयर कंपनीच्या आॅनलाईन मेंबरशीपसाठी सायका फारुख शेख (२६, रा.मेहरुण) या महिला डॉक्टरची १६ हजार ९०० रुपयात तर आॅनलाईन टी.व्ही.बुकींगची चौकशी करण्यासाठी मिलिंद अशोक वानखेडे (रा.मुकुंद नगर, हरिविठ्ठल नगराजवळ) या तरुणाचा मोबाईल हॅक करुन ३९ हजार २८८ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनुक्रमे एमआयडीसी व रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.महिला डॉक्टरची १७ हजारात ऑनलाईन फसवणूकजळगाव : कुरीयर कंपनीच्या आॅनलाईन मेंबरशीपसाठी पाठविलेल्या ओटीपी क्रमांक विचारुन सायका फारुख शेख (२६, रा.मेहरुण) या महिला डॉक्टरची १६ हजार ९०० रुपयात आॅनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी १५ आॅगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत माहिती अशी की, डॉ.सायका शेख यांचे मेहरुणमध्ये क्लिनिक आहे. ७ आॅगस्ट २०२० रोजी दुपारी ४.३० वाजता त्यांनी मोबाईवरुन डीटीडीसी कुरीअर कंपनीच्या आॅनलाईन मेंबरशिपसाठी आॅनलाईन फार्म भरला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना मोबाईलवर फोन आला. तुमची डीटीडीसी कुरियरची मेंबरशिप पूर्ण  झाली असून मेंबरशिपचा ओटीपी तुमच्या मोबाईलवर पाठविला आहे, तो क्रमांक सांगा. असे म्हटल्यावर डॉ. सायका शेख यांनी चार अंकी ओटीपी क्रमांक दिला. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांना ९ हजार ९९९ आणि ७ हजार रुपये असे एकूण १६ हजार ९९९  रुपये बँकेच्या खात्यातून कमी झाल्याचा संदेश आला. याबाबत त्यांनी तत्काळ फोन आलेल्या क्रमाकांवर संपर्क केला असता  पैश्यांबाबत उडवाउडवीची उत्तरे मिळाली. आठवडाभरानंतर डॉ. सायका शेख यांच्या फिर्यादीवरुन १५ आॅगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

 मोबाईल हॅक करुन ३९ हजाराचा  ऑनलाईन गंडाआॅनलाईन टी.व्ही बुकींग केल्यानंतर निर्धारित तारखेला टी.व्ही.न मिळाल्याने त्याची चौकशी करण्यासाठी परत आॅनलाईन साईडवर गेलेल्या मिलिंद अशोक वानखेडे (रा.मुकुंद नगर, हरिविठ्ठल नगराजवळ) या तरुणाचा मोबाईल हॅक करुन त्यांच्या बॅँक खात्यातून दोन वेळा ३९ हजार २८८ रुपये आॅनलाईन वळविण्यात आल्याचा प्रकार १४ आॅगस्ट रोजी घडला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.मिलिंद वानखेडे हे खासगी कंपनीत नोकरी करतात. ८ आॅगस्ट रोजी दुपारी त्यांनी आॅनलाईन टी.व्ही. बुकींग केला.त्यासाठी २६ हजार ४३३ रुपये त्यांनी आॅनलाईनच भरले. १३ आॅगस्टपर्यंत टी.व्ही. घरपोच मिळणे अपेक्षित होते, मात्र मिळाला नाही, त्यामुळे वानखेडे यांनी १४ रोजी इंटरनेटचा वापर करुन संबंधित फर्मचा संपर्क क्रमांक शोधून त्यावर संपर्क साधला. त्या व्यक्तीनेही वानखेडे यांना मी तुमची अडचण दूर करतो, त्यासाठी आॅनलाईन ११ रुपये भरायला लावले व त्यानंतर मोबाईलवर एक अ‍ॅप डाऊनलोड करायला लावले. ही प्रक्रिया केल्यानंतर वानखेडे यांचा मोबाईल हॅक करुन समोरील व्यक्तीने २६ हजार ६५० व दुसºया टप्प्यात १२ हजार ६३८ असे एकूण ३९ हजार २८८ रुपये आॅनलाईन वळविले.तिसºया वेळेस व्यवहार होण्यापूर्वी त्याच वेळी वानखेडे यांना बॅँकेतून फोन आला व हा व्यवहार तुम्ही स्वत: करीत आहात का? अशी विचारणा केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याचे वानखेडे यांनी बॅँकेला कळवून तातडीने क्रेडीट कार्ड ब्लॉक केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव