मोबाईलचा वापर हा हल्ली मोठ्या प्रमाणात केला जातो. फोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. फोनमुळे कमी वेळात अनेक गोष्टी करणं सोपं होतं. फोनचा जसा फायदा आहे तसा तोटा देखील आहे. पती-पत्नीत काही कारणामुळे वाद होत असतात. काही भांडणं ही अनेकदा टोकाला देखील जातात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. फोनमुळे पत्नीने टोकाचं पाऊल उचललं. झारखंडमधील पलामू जिल्ह्यात एका महिलेने मोबाईलमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील रेहला पोलीस स्टेशन हद्दीतील सिगसिगी पंचायतीच्या झुरहीटोला येथील रहिवासी पिंटू चौधरी यांची पत्नी चिंता देवी विनय हिने मोबाईल तोडल्याचा राग मनात धरून आपले जीवन संपवलं आहे. चिंता देवी मोबाईलमध्ये जास्त व्यस्त असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. या वादातून पती पिंटू चौधरी याने चिंता देवी यांना फोन वापरण्यास मनाई केली.
पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. याच दरम्यान रागाच्या भरात पिंटू चौधरी याने पत्नी चिंता देवी हिचा मोबाईल जमिनीवर फेकला आणि तोडला. पतीने फोन अशा प्रकारे तोडल्याने संतापलेल्या चिंतादेवीने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येची माहिती मिळताच रेहला पोलीस ठाण्याचे पोलीस सिगसिगी पंचायतीच्या झुरहीटोला येथे पोहोचले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी मेदिनीनगर येथील मेदनी राय मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवला.
रेहला पोलीस स्टेशनचे प्रभारी धारी रजक यांनी सांगितले की, मोबाईलवरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. याच दरम्यान पती पिंटू चौधरी याने पत्नी चिंता देवीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तोडला, त्यामुळे पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेबाबत रेहळा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पतीसह घरात उपस्थित असलेल्या इतर लोकांकडे चौकशी केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"