मुंबई : सेक्टॉर्शनच्या जाळ्यात अडकल्यानंतर, प्लेबॉयच्या नोकरीच्या नादात काळाचौकी येथील तरुणाला पावणेदोन लाख रुपये गमाविण्याची वेळ ओढावली आहे. याप्रकरणी, काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. काळाचौकीतील अभ्युदय नगरमध्ये राहण्यास असलेल्या ३० वर्षीय मुलगा हा लोअर परळमधील एका कंपनीत नोकरी करतो. १३ मार्च रोजी त्याला फेसबुकवर नीलम कुमारी आणि अंजली शर्मा या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. तरुणाने कुठलीही खातरजमा न करता रिक्वेस्ट स्वीकारल्या. त्यानंतर दोघींसोबत संवाद वाढला. पुढे अश्लील संवाद करीत, त्याला नग्न होण्यास भाग पाडले. पुढे याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करीत त्याच्याकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. पुढे त्यांच्या साथीदाराने दिल्लीतील सायबर गुन्हे शाखेमधून अरुण सक्सेना बोलत असल्याचे सांगत त्या मुलींना पकडण्यासाठी आणि व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड होण्यापासून थांबविण्यासाठी पैसे मागितले. यात त्याच्यासोबत कुलदीप कुमार होता. तसेच संजय सिंग याने यू-ट्यूबवर अपलोड होत असलेला व्हिडिओ बंद करण्यासाठी पैसे घेतले. वरील तिघांसोबत गौरव मल्होत्रा, राहुल शर्मा यांनीही राहुलला कॉल करून घाबरवले. या सर्वांनी त्याच्याकडून ६० हजार ५५६ रुपये उकळले. सेक्टॉर्शनचे हे रॅकेट सुरू असतानाच तरुणाने हा गुगलवर प्ले बॉयची नोकरी देण्याच्या टोळीच्या जाळ्यात अडकला.
Crime News: प्लेबॉयची नोकरी करण्याचा मोह नडला, तरुणाचे लाखो रुपये लुबाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 9:02 AM