पुणे : शेअर मार्केटमध्ये डिमॅट खाते सुरू करून देण्याच्या आमिषाने दाम्पत्याची सुमारे पावणेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील एका तरुणाला अटक केली. न्यायालयाने त्याला ३१ डिसेंबरपर्यंत कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.शुभो शिबू हलदार (वय २६, रा. कृष्णानगर, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अब्दुल सत्तारहुसेन शेख (वय ४२, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. ४ जून ते १४ आॅगस्ट २०१८ या कालावधीत येरवडा परिसरात ही घटना घडली.शेख यांचा केटरर्सचा व्यवसाय आहे. हलदार हा त्यांच्याकडे कामाला होता. त्या वेळी हलदार याने शेख पती-पत्नींचा विश्वास संपादन करून त्यांना व्हेंचुरा सिक्युरिटी शेअर्स मार्केट कंपनीमध्ये डिमॅट खाते सुरू करण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी हलदार याने शेख यांच्याकडून ४ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, डिमॅट खाते काढून न देता शेख यांच्याकडून घेतलेली रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरून हलदार याने शेख यांची फसवणूक केली. तसेच, शेख यांचा मित्राच्या बँक खात्यातील २० हजार रुपये काढून घेत एकूण ४ लाख ६९ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली.
दाम्पत्याला पावणेपाच लाखांचा घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 1:21 AM