नवी दिल्ली - झारखंडच्या रांचीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील मैत्री एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. "10 लाख दे नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करेन" अशी धमकी मिळाली आहे. एका तरुणीने पोलिसांत अश्लील फोटो व्हायरल न करण्याच्या बदल्यात एक तरुण 10 लाख रुपये मागून ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार दाखल केली आहे. तरुणीने आपल्या तक्रारीत सोशल मीडियावर मैत्री झालेल्या तरुणाने तरुणीचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सअप ग्रुपवरून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं म्हटलं आहे.
फोटो व्हायरल होऊ द्यायचे नसतील, तर 10 लाख रुपये देण्याची मागणीही तरूणाने केली. त्यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रांचीमधील 24 वर्षीय तरुणीची शफीक अन्सारी नावाच्या तरुणाशी सोशल मीडियावर ओळख झाली. हळूहळू ही ओळख मैत्रीत परिवर्तीत झाली आणि त्या दोघांनी प्रत्यक्ष भेटायला सुरुवात केली. भेटीच्या वेळी ते दोघंही एकमेकांना आपला फोन देत असत आणि त्याचा गैरफायदा घेत तरुणीच्या मोबाईलमधले तिचे काही फोटो आणि व्हिडिओ तरुणाने स्वतःकडे घेतले. फोटो मिळाल्यानंतर काही दिवसांतच त्याने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.
जीवे मारण्याची आणि हे फोटो व्हायरल करण्याची धमकी
फोटोशॉपचा वापर करून आपले मूळ फोटो बदलून अश्लील फोटो आणि व्हिडीओ या तरुणाने तयार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. शफीकने तरुणीची ओळख असणाऱ्या काही ग्रुपमध्ये हे फोटो टाकायला सुरुवात केली. त्या ग्रुपमधील ओळखीच्या सदस्यांकडून जेव्हा तरुणीला ही गोष्ट समजली तेव्हा तिला मोठा धक्का बसला. तिने फोन करून शफीकला याचा जाब विचारला. मात्र त्याने तिला थेट जीवे मारण्याची आणि हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या फोटोंच्या बदल्यात 10 लाख रुपये देण्याची मागणी देखील तरुणीकडे केली.
"10 लाख दे नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करेन"
शफीकने मैत्री करताना तो विवाहित नसल्याचं सांगितलं होतं. मात्र नंतर तरुणीला तो विवाहित असल्याचं समजलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणीने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला आणि पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. 10 लाख दे नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करेन अशी धमकी देत असल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे. लवकरच तरुणाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.