शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सरकारी क्वार्टरमध्ये आढळला अल्पवयीन मुलाचा मृतदेह: कुटुंबीयांनी केला दुष्कर्म अन् हत्येचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 3:01 PM

Crime News : एका 14 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

नवी दिल्ली - राजस्थानच्या बिजलिया परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सरकारी क्वार्टरमध्ये अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी दुष्कर्म आणि हत्येचा गंभीर आरोप केला आहे. शेजारी राहणाऱ्या एका तरुणावर मुलाच्या नातेवाईकांनी आता आरोप केले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका जुन्या सरकारी क्वार्टरमध्ये शिनाख्त परिसरात राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

मुलाच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणारा मुलगा आपल्या मुलाला त्याच्या घरी बोलवण्यास आला होता. त्यानंतर मुलगा त्याच्यासोबत निघून गेला पण तो परत घरी आलाच नाही. गावातील लोकांनी आणि नातेवाईकांनी मुलाला सर्वत्र शोधलं पण मुलगा कुठेच सापडला नाही. त्यानंतर सरकारी क्वार्टरमध्ये संशयास्पद अवस्थेत मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळेच कुटुंबीयांनी मुलासोबत दुष्कर्म करून त्याची हत्या केल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

मुलाची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. हत्येप्रकरणी वडिलांनी आणखी काही लोकांवर देखील संशय व्यक्त केला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह हा कुटुंबीयांना देण्यात आला असून सर्वांनाच यामुळे मोठा धक्का बसला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अशीच एक भयंकर घटना घडली आहे. ईअरफोन एका तरुणासाठी जीवघेणा ठरला आहे. गाणी ऐकताना कानातच ईअरफोनचा ब्लास्ट झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यानंतर तरुणाच्या कानातून रक्त वाहून लागले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

भयंकर! ईअरफोन ठरला जीवघेणा, गाणी ऐकताना कानातच झाला स्फोट; काही महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न

राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील उदयपुरिया गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. गाणी ऐकण्यासाठी तरुणाने ईअरफोन लावले होते. त्याचदरम्यान ईअरफोनच्या स्पीकर फुटला. राकेश नागर असं या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. ईअरफोनच्या स्फोटामुळे मोठा आवाजही झाला. राकेशच्या कानातून रक्त वाहू लागलं. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. राकेश नागरचं याच वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न झालं होतं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतDeathमृत्यूPoliceपोलिसRajasthanराजस्थान