नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका बलात्कार पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका 15 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला होता. यानंतर नैराश्यात असलेल्या मुलीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवलं आहे. मुलीने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
कानपूर देहातचे पोलीस अधीक्षक केशव कुमार चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी बलात्कार आणि लैंगिक शोषणाची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. घटनास्थळी इंग्रजी भाषेत लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली आहे. ज्यामध्ये मुलीने आपल्या मर्जीने आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच आपल्या आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नसल्याचं देखील सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कुटुंबाने आपल्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने मुलीवर बलात्कार केल्याची तसेच तिचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अधिक तपास केला. मुलीने आत्महत्या केल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळफास घेतल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. तसेच पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
संतापजनक! मुख्याध्यापकाचं विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन; घरच्यांनी शिकवला चांगलाच धडा, केली यथेच्छ धुलाई
बिहारमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचं उघड झालं आहे. विद्यार्थिनीची छेड काढणं मुख्याध्यापकाला चांगलंच महागात पडलं आहे. नागरिकांनी ही घटना समोर आल्यानंतर त्याची यथेच्छ धुलाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापकावर आपल्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मुख्याध्यापकाला अटक करण्यात त्यांना यश आलं आहे. जिल्ह्यातील सीमापूर परिसरातील पिपरी बहियार प्रायमरी स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या एका मुलीसोबत मुख्याध्यापकाने चुकीचं वर्तन करण्याचा प्रयत्न केला.