अजबच! 15 दिवसांत दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला काँग्रेसचा नेता; पोलिसांनी मंडपातून घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 07:36 PM2022-05-27T19:36:25+5:302022-05-27T19:37:49+5:30
Crime News : नैतिक चौधरी असं या नेत्याचं नाव असून पोलिसांनी त्याला दुसऱ्यांदा लग्न करताना पकडलं आहे. तसेच आता ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात गुरुवारी एक अजब घटना घडली. मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेत मिळणाऱ्या लाभाच्या हव्यासापोटी एनएसयूआयच्या राष्ट्रीय समन्वयकाने चक्क दुसऱ्यांदा विवाह केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याचा पहिला विवाह हा 15 दिवसांपूर्वीच झाला होता आणि तेही लव्ह मॅरेज. नैतिक चौधरी असं या नेत्याचं नाव असून पोलिसांनी त्याला दुसऱ्यांदा लग्न करताना पकडलं आहे. तसेच आता ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. याच दरम्यान भाजपाने काँग्रेसला टोला लगावला आहे. यासोबतच यावरून निशाणा साधला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागरमधील बालाजी मंदिर परिसरात सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात 135 जोडप्यांनी विवाह केला. एनएसयूआयचे राष्ट्रीय समन्वयक नैतिक चौधरी यांना मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेच्या अंतर्गत मिळणारा लाभ हवा होता. त्यामुळे नैतिक चौधरी पत्नीला घेऊन दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याला पोहोचले. नैतिक चौधरींना मंडपात पाहून कोणीतरी याची माहिती आयोजकांना दिली. त्यानंतर आयोजकांनी याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं सोहळ्यास्थळी येऊन नैतिक चौधरींना ताब्यात घेतलं.
यह श्रीमान एनएसयूआई के राष्ट्रीय समन्वयक हैं। मुख्यमंत्री कन्यादान योजना का लाभ लेने के लिए दूसरी बार विवाह रचाने चले थे।
— लोकेन्द्र पाराशर Lokendra parashar (@LokendraParasar) May 26, 2022
खबर है कि पुलिस ने दबोच लिया है ।
क्या कहते हैं कमलनाथ जी! @NSUIMP@nsuipic.twitter.com/804Vq9z1wv
नैतिक चौधरींना पोलीस ठाण्यात नेलं. नैतिक चौधरींचा विवाह दोनच आठवड्यापूर्वी धूमधडाक्यात संपन्न झाला होता. पोलीस नैतिक यांना पोलीस ठाण्यात नेत असताना पत्नीदेखील त्यांच्यामागे धावली. दुसऱ्यांदा विवाह करायला नको, असं पत्नीनं नैतिक यांना सांगितलं होतं. पोलीस आता नैतिक चौधरींची चौकशी करत आहेत.
मध्य प्रदेश भाजपाचे माध्यम प्रभारी लोकेंद्र पराशर यांनी या प्रकरणावरून ट्विट करत जोरदार निशाणा साधला. "हे श्रीमान एनएसयूआयचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. मुख्यमंत्री कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी दुसऱ्यांदा विवाह करण्यास जात होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. काय म्हणता कमलनाथजी!" असा टोला पराशर यांनी लगावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.