मॉस्को - तब्बल २०० हून अधिक महिलांची क्रूरपणे हत्या करणारा रशियामदील सर्वात क्रूर सीरियल किलर सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. रशियातील तो अशी एकमेवर व्यक्ती आहे, जो दोन आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहे. त्याचे नाव मिखाईल पोपकोव्ह आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो रशियामध्ये पोलिसाची नोकरी करत होता.
डेली स्टार मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार त्याचा उल्लेख रशियामधील सर्वात मोठा सीरियल किलर म्हणून करण्यात आला आहे. कारण त्याने अनेक निष्पाप महिलांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली होती. त्याच्या का कुकृत्याबाबत ऐकल्यावर कुणाच्याही अंगाचा थरकाप उडू शकतो. या महिलांची हत्या करण्यापूर्वी तो महिलांना कुऱ्हाड, हातोडा आणि चाकूसारख्या धारदार हत्यारांनी वार करत जखमी करत असे. त्यानंतर त्यांना ठार मारत असे.
पोलिसांनी त्या महिलांचे मृतदेह पाहिले होते. तेव्हा त्यांनी दोषी मिखाईल याला वेअरवोल्फ अशी उपमा दिली होती. ५७ वर्षीय मिखाईल सुमारे दोन दशकांपर्यंत अंगार्स्कमध्ये अशा प्रकारच्या घटना घडवून आणत होता. तसेच त्याची साधी कुणकुणही लागली नव्हती. तसेच कुणी त्याच्यावर संशयही घेत नव्हता, कारण तो पोलीस कर्मचारी होता.
जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा २०१५ मध्ये कोर्टाने त्याला २२ महिलांच्या हत्येप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा त्याला १९९२ ते २०१० या काळात केलेल्या हत्यांप्रकरणामध्ये सुनावण्यात आली.
मिखाईल पोपस्कोव्ह हा अत्यंत क्रूर आणि चालाख सीरियल किलर होता. तो हत्या केल्यानंतर जंगलात रस्त्याच्या कडेला मृतदेह फेकत असे. जेव्हा कोर्टाने त्याला हत्या करण्यामागचं कारण विचारलं तेव्हा त्याने मी शहरातून घाण स्वच्छ केली. या महिलांना त्यांच्या अमैतिक वागण्याची शिक्षा मिळाली. मला माझ्या कृत्याचा काहीच पश्चाताप नाही, असे मिखाईल याने सांगितले.
हत्या करण्यासाठी महिला हेरण्यासाठी मिखाईल हा क्लब आणि बारच्या आजूबाजूला घुटमळायचा. त्यानंतर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला गाडीत बसवायचा, मग एकांतात जाऊन त्या महिलेवर बलात्कार करून तिचे हालहाल करून तिला ठार मारायचा. मिखाईल हा बहुतकरून महिलांनाच ठार मारायचा. मात्र त्याने एका पुरुष आणि एका पोलिसाचीही हत्या केली होती.