नवी दिल्ली - पंजाबमध्ये मन हेलावणारी एक घटना समोर आली आहे. 3 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीचा सासरीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुक्तसरजवळील गावात ही धक्कादायक घटना घडली. मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप लावला आहे. तरुणीच्या सासरच्या मंडळींविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तर दुसरीकडे तरुणीचे पोस्टमार्टम करण्यातही दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे संतप्त आई-वडिलांनी आंदोलन केलं आहे. गगनदीप कौर असं तरुणीचं नाव असून तिने चार सेकंदांचा एक व्हॉईस मेसेज केला होता. त्यात तिने तिला सल्फास दिल्याचं म्हटलं आहे.
गगनदीप कौर हिचे नातेवाईक परमजीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गगनदीप कौर हिचं तीन महिन्यांपूर्वी गुरप्रीत सिंग या तरुणाशी लग्न लावून दिलं होतं. लग्नाच्या वेळी परिस्थितीनुसार त्यांना हुंडाही देण्यात आला होता. लग्नाच्या 10 ते 15 दिवसांपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र त्यानंतर सासरची मंडळी हुंड्यासाठी मुलीला त्रास देऊ लागले. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलीला मारहाण केली व माहेरी सोडून गेले. त्यानंतर पंचायतीत हे प्रकरण गेलं आणि सर्व भांडण सोडवून मुलगी सासरी गेली. मात्र त्यानंतर पुढील 10 दिवसात सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा मारहाण करुन माहेरी सोडलं.
गेल्या 20 दिवसांपासून ती माहेरीच राहत होती. 2 दिवसांपूर्वी मुलाची आई, नवरा आणि नणंद गावात आले व मुलीला घेऊन गेले. त्याच दिवशी मुलीच्या मृत्यूची माहिती मिळाली. यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, मुलीचा एक ऑडिओ मेसेज आला होता, ज्यात तिने सांगितलं होतं की, सासरच्या मंडळींनी तिला सल्फास नावाची गोळी दिली आहे. यानंतर मुलीच्या पतीचा फोन आला की, मुलीने सल्फास गोळी घेतली आहे. हे ऐकताच मुलीच्या कुटुंबाला धक्का बसला. त्यांनी मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं. जेव्हा मुलीचे नातेवाईक तेथे पोहोचले तेव्हा तिचा मृतदेह रुग्णवाहिकेत पडला होता आणि तिच्याजवळ कोणीच नव्हतं.
मुलींवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात तिच्या आई-वडिलांनी न्यायाची मागणी केली आहे. जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही, तोपर्यंत तिच्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुजरातमधील सुरतमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. मास्क लावला नाही म्हणून पोलीस हवालदाराने आपल्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. मास्क न घालता फिरत असल्याच्या कारणावरुन या हवालदाराने पीडित महिलेला ताब्यात घेतलं होतं. सुरत येथील उमरपाडा पोलीस स्थानकामध्ये हा हवालदार कार्यरत आहे.
धक्कादायक! मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसाने केला बलात्कार; परिसरात खळबळ
मास्क घातलं नाही म्हणून कठोर कारवाई करेन अशी धमकी देत हवालदार मला त्याच्यासोबत घेऊन गेल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्यानंतर या हवालदाराने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर पुढे अनेक महिने तो माझ्यावर वारंवार बलात्कार करायचा असं देखील म्हटलं आहे. महिलेने हवालदारावर बलात्काराचा आरोप केलेला असतानाच हवालदाराच्या पत्नीने पीडित महिला जातीवरुन आरोप करत असल्याचा दावा केला आहे. नरेश कपाडिया असं असं आरोप करण्यात आलेल्या पोलिसांचं नाव आहे. त्यामुळेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.