शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

Crime News: थरकाप उडवणारी घटना, मुंबईत प्रेमप्रकरणातून तीन महिलांची हत्या करत एकाची आत्महत्या? रुग्णालयात मृतदेह सापडल्याने खळबळ  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 10:44 AM

Crime News: मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. एका ड्रायव्हरने प्रेमप्रकरणातुन डॉक्टरची पत्नी आणि त्याच्या दोन मुलीची हत्या करत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई - मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. एका ड्रायव्हरने प्रेमप्रकरणातुन डॉक्टरची पत्नी आणि त्याच्या दोन मुलीची हत्या करत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कांदिवली पोलिसानी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. सर्व मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, घटनास्थळी पाच सुसाईड नोटही सापडल्या आहेत, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि शिवदयाल सेन अशी मृतांची नावं आहेत. दरम्यान, भूमी दळवी नामक महिलेच्या  प्रेमात पडल्याने तीन महिलांची हत्या करून गळफास घेतल्याचा उल्लेख ड्रायव्हर शिव दयाल याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार कांदिवली देना बँक जंक्शन येथे एक माणूस हातात विळा घेऊन फिरत आहे अशी माहिती कांदिवली पोलिसांना नियंत्रण कक्षावर मिळाली. त्यानुसार मोबाईल व्हॅनसह रात्र पाळीवर असलेल्या पोलीस निरीक्षक पीआय वारे घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी परिसराची झडती घेतली. लोकांशी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की त्यांनी एका व्यक्तीला २ महिलांसह दळवी हॉस्पिटलच्या इमारतीत जाताना पाहिले आणि त्यांना त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. डिटेक्शन कर्मचारी आणि मोबाईल कर्मचाऱ्यांच्या मदतीने परिसराची झडती घेतली असता रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर दोन महिलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडले. पहिल्या मजल्यावरही शोध घेतला असता तेथे दोन व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत आढळल्या अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे.याप्रकरणी कांदिवली पोलीस अधीक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई