शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

Crime News: धक्कादायक! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती, प्रेयसीचे ६ तुकडे केले, वेगवेगळ्या ठिकाणी फेकले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 1:27 PM

Crime News: दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे संपूर्ण देशात खळबळ उडालेली असतानाच आता एका माथेफिरू प्रियकराने प्रेयसीचं लग्न अन्य व्यक्तीशी झाल्याने संतापाच्या भरात तिचे तुकडे तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

लखनौ - दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे संपूर्ण देशात खळबळ उडालेली असतानाच आता अशाच प्रकारची भयावह घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. येथे एका माथेफिरू प्रियकराने प्रेयसीचं लग्न अन्य व्यक्तीशी झाल्याने संतापाच्या भरात तिचे तुकडे तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

श्रद्धा वालकर हत्याकांडाशी मिळतेजुळते असे हे भयानक हत्याकांड उत्तर प्रदेशमधील आझमगड जिल्ह्यात घडले आहे. तेथील अहरौली पोलीस ठाण्याच्या परिसरात एका माथेफिरू प्रियकराने प्रेयसीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून त्याचे सहा तुकडे केले. 

पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले की, १६ नोव्हेंबर रोजी गौरी का पुरा नावाच्या गावात रस्त्याशेजारी एका तरुणीचा तुकडे तुकडे केलेला मृतदेह सापडला होता. तिची ओळख इसहाकपुरा येथील रहिवासी केदार प्रजापती यांची कन्या आराधना अशी पटली होती. पोलिसांनी या प्रकरणात पुराव्यांचे धागेदोरे मिळवत मुख्य आरोपी प्रिंस यादव याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने आपला गुन्हा कबूल करत भयावह कबुलीजबाब दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रिंस यादव आणि आराधना यांचे आधीपासून प्रेमसंबंध होते. मात्र आराधनाचं लग्न दुसऱ्याच व्यक्तीसोबत झाल्याने प्रिंस संतप्त झाला होता. त्यातून त्याने आराधनाची हत्या करण्याचा कट रचला. या प्रकरणात त्याला त्याचे आई-वडील, मामा-मामी, मामाचा मुलगा आणि त्याच्या पत्नीनेही मदत केली. हा गुन्हा करताना प्रिंसच्या मामाचा मुलगा सर्वेशही त्याच्यासोबत होता. आता पोलीस या प्रकरणी पाच महिलांसह आठ आरोपींचा शोध घेत आहेत. 

आरोपी प्रिंस हा आखाती देशात शारजामध्ये लाकूड कापण्याचं काम करतो. त्याचे आराधनासोबत प्रेमसंबंध होते.  मात्र यादरम्यान, फेब्रुवारी २०२२ मध्ये तिचा विवाह एका अन्य एका तरुणासोबत झाल्याने तो शारजाहून परत आला होता.   

९ नोव्हेंबर रोजी तो आराधनाला भैरव धामच्या दर्शनासाठी तिच्या घरातून घेऊन गेला. त्याने तिला एका रेस्टॉरंटमध्ये नेले. त्यानंतर तिला बळजबरीने मामाच्या उसाच्या शेतात नेले. तिथे प्रिंस आणि त्याच्या मामाच्या मुलाने तिची गळा दाबून हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिले. मिळत असलेल्या माहितीनुसार प्रिंस याचे मामाचा मुलगा सर्वेश याच्या पत्नीसोबतही अफेअर सुरू होते. दरम्यान, पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केल्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी रात्री त्याला बेड्या ठोकल्या.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशShraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर