शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Crime News: धक्कादायक प्रकार! मंत्रतंत्र, भूतबाधेची भीती दाखवून मांत्रिकाने शेकडो महिला, मुलींवर केले अत्याचार    

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 3:52 PM

Crime News: राजस्थानमधील अजमेरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका ढोंगी तांत्रिकाने मंत्र तंत्राचा आधार घेत भूतातटकीची भीती दाखवत शेकडो महिला आणि मुलींची अब्रू लुटल्याचे उघड झाले आहे. Rajendra Valmiki असे या तांत्रिकाचे नाव आहे.

जयपूर - राजस्थानमधील अजमेरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका ढोंगी तांत्रिकाने मंत्र तंत्राचा आधार घेत भूतातटकीची भीती दाखवत शेकडो महिला आणि मुलींची अब्रू लुटल्याचे उघड झाले आहे. राजेंद्र वाल्मिकी असे या तांत्रिकाचे नाव आहे. एका पीडित महिलेने तक्रार केल्यावर या तांत्रिकाचे बिंग फुटले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत या तांत्रिकाच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, अंधविश्वासाच्या अधीन झालेल्या शेकडो कुटुंबातील महिला आणि मुलींच्या अब्रुला या तांत्रिकाने हात घातला असून, आतापर्यंत ३०० ते ४०० कुंटुंबे या तांत्रिकाची शिकार झाली आहेत.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी दिलेल्या माहितीनुसार भूत प्रेत उतरण्याचे सोंग घेऊन हा तांत्रिक भोळ्याभाबड्या कुटुंबानां आपल्या जाळ्यात ओढत असे. गंभीर बाब म्हणजे सुशिक्षित कुटुंबेही या तांत्रिकाची शिकार झाली आहेत. अंगातील भूत प्रेत काढण्याच्या नावावर हा तांत्रिक महिला आणि मुलींचं लैंगिक शोषण करत होता. तसेच त्यांच्याकडून भरपूर पैसेही लाटत असे. तसेच हा तांत्रिक पीडित कुटुंबांना मृत्यूची एवढी भीती घालायचा की संपूर्ण कुटुंबच त्याच्यासमोर समर्पण करायचे.

सांगवान यांनी सांगितले की, या पाखंडी तांत्रिकाला जेरबंद करण्यामध्ये अजमेरमधील एका पीडितेने दाखवलेली हिंमत महत्त्वाची ठरली. तिने कुटुंबीयांचा विरोध झुगारत पोलिसांकडे तक्रार केली. पीडितेच्या कुटुंबीयांनी या तांत्रिकाशी संपर्क साधून त्यांच्या मुलीवर आलेल्या भूताचा उतारा कऱण्यासाठी भरपूर पैसे दिले होते. मात्र भूत उतरण्याच्या बहाण्याने या तांत्रिकाने या कुटुंबाच्या अब्रूलाच हात घातला.

सदर तांत्रिकाला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्याने पोलिसांवरच जादूटोणा करण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांच्या खाक्यापासून तो फारवेळ वाचू शकला नाही. दरम्यान, आरोपी हा वयाच्या १८ व्या वर्षापासून या कुकृत्यामध्ये गुंतला असून, त्याने आतापर्यंत ३०० ते ४०० कुटुंबांना आपली शिकार बनवल्याचे समोर आले आहे.  दरम्यान, या आरोपीची पोलीस कसून चौकशी करत आहेत. तसेच हे प्रकरण केस ऑफिसर स्किममध्ये घेऊन तपासासाठी एसआयटीची स्थापना झाली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानFamilyपरिवार