भोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यात पोलिसांनी हत्येच्या एका धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा करत मृत तरुणीच्या वहिनीला अटक केली आहे. आरोपी वहिनीला तिच्या नणंदेची चुगल्या करण्याची सवय आवडत नव्हती. त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलत आपल्या नणंदेची हत्या केली. एक ऑक्टोबर रोजी भानपुरामध्ये राहणारी १४ वर्षीय हर्षिता अचानत बेपत्ता झाली होती. खूप शोधाशोध केल्यानंतर ती घराजवळ असलेल्या छोट्या विहिरीत तिचा मृतदेह सापडला होता. त्याबाबत तिचे वडील सुरेश यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.
त्यानंत पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला होता. तपासामद्ये मृत तरुणीच्या गळ्यावर आणि नाकावर जखमांच्या गंभीर खुणा आढळल्या. तसेच तिच्या शॉर्ट पोस्टमार्टेममध्ये मृत्यूच्या आधी तिला जखम झाल्याचे आणि पाण्यात बुडाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
याबाबत घरातील लोकांकडे चौकशी करण्यात आली. तसेच मृत तरुणीच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले. तसेच पोलिसांनी घटनास्थळाचे बारीक निरीक्षण केले. तपासादरम्यान, कुटुंबीयांनी मृत तरुणीच्या २२ वर्षीय वहिनीवर संशय घेतला. तेव्हा वहिनी रश्मी हिची चौकशी केली असता तिने गुन्हा कबुल केला. तिने सांगितले की, लग्नानंतर तिची नणंद दिवसभर गप्पागोष्टी करून तिचा पती ऐश्वर्य आणि सासऱ्यांना सांगत असे.
एक ऑक्टोबर रोजी आरोपी वहिनी आणि नणंद आंधळी कोशिंबिर खेळत होते. त्याचवेळी वहिनीने नणंदेवर चाकूने वार केले. त्यानंतर तिला फरफटत विहिरीजवळ नेले आणि तिला विहिरीत ढकलून दिले. गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वहिनीला तिच्या नणंदेची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.