रोहतक (हरियाणा) - हरियाणामधील रोहतक जिल्ह्यातील विजयनगर कॉलनीमध्ये शुक्रवारी झालेल्या चार जणांच्या हत्येचे गुढ अखेर पोलिसांनी उलगडले आहे. २० वर्षांच्या मुलानेच आई-वडील, बहिणीसह आजीची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी अभिषेक उर्फ मोनू याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने हत्येमागील कारणाचा उलगडा केला आहे. (so he killed the whole family including parents, sister, grandmother)
रोहतकचे एसपी राहुल शर्मा यांनी प्रेस कॉन्फ्रन्स करून या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, आरोपीने हे कृत्य करण्यामागचे कारण मालमत्तेचा वाद आणि घरगुती भांडण हे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबाची मातमत्ता बहिणीच्या नावे होती. त्यामुळे आरोपी नाराज होता. त्यामुळे त्याने संपूर्ण कुटुंबाचंच हत्याकांड घडवून आणलं. पोलिसांनी चार दिवसांपर्यंत संशयितांसोबत चर्चा केल्यानंतर मुख्य आरोपीला सोमवारी चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर ही सत्त माहिती समोर आली.
शुक्रवारी दुपारी विजयनगरमध्ये राहणाऱ्या प्रदीप मलिक आणि त्यांची पत्नी, मुलगी आणि सासूवर घरात घुसून गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये प्रदीप, त्यांची मुलगी आणि सासूचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर मुलगी नेहाचा मृत्यू रुग्णालयात उपचारांदरम्यान झाला होता. या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभिषेक उर्फ मोनू हा मृतांचा एकमेव मुलगा आहे.