शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नात्याला काळीमा! मुलगाच झाला वैरी, विजेचा शॉक देऊन वडिलांची हत्या, गुपचूप केले अंत्यसंस्कार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 4:16 PM

Crime News son accused of killing father : मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना देशात अनेक भयंकर घटना समोर येत आहेत. नात्याला काळीमा फासणारी अशीच एक घटना आता समोर आली आहे. मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबच्या गुरुदारपूरमध्ये एका मुलाने आपल्या वडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. संतापजनक बाब म्हणजे मुलाने विजेचा शॉक देऊन वडिलांना संपवलं आणि कोणाला काही संशय येऊ नये म्हणून वडिलांवर एकट्यानेच अंत्यसंस्कार करून टाकले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांनी वडिलांच्या हत्येप्रकरणी मुलाला अटक केली आहे. हरपाल सिंह असं आरोपीचं नाव असून त्याने वडील तरसेम सिंह यांना रात्री ट्रॉलीमध्ये घेऊन अंत्यसंस्कार केले आणि राखही विसर्जित केली. पोलिसांनी तरसेम यांचा मोठा मुलगा रछपाल सिंह याने दिलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. रछपाल सिंहने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची आई बलविंदर कौर यांचा 2019 मध्ये मृत्यू झाला होता. त्याच्या वडिलांची वडिलोपार्जित जमीन सुमारे साडे 12 एकर असून ती पत्नी आणि मुलांच्या वाट्याला समान आली.

आईच्या निधनानंतर त्यांचे वडील गावातच एका वेगळ्या घरात राहत होते. जवळपास आठ महिन्यांपूर्वी त्याने वडिलांना आपल्याकडे आणलं होतं. काही दिवसांपूर्वी वडील गावात आले होते. दुसर्‍या दिवशी रछपाल सिंह याला माहिती मिळाली की हरपाल आपल्या वडिलांशी भांडत आहे. त्याने भावाला फोनवर वडिलांशी बोलण्यास सांगितलं, परंतु बोलणं झालं नाही, त्यानंतर  त्याला अचानक गावातून फोन आला की काल रात्री वडिलांचं निधन झालं आहे आणि लहान भावानं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत.

पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर हरपाल सिंह याने विजेचा शॉक देऊन वडिलांची हत्या केली आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. यानंतर त्याने त्यांच्या अस्थी किरतपूर साहिबमध्ये विसर्जित केल्या अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हुंड्यासाठी एका विवाहितेचा प्रचंड छळ करून तिला अ‍ॅसिड पाजल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांतच पती हैवान झाला असून सासरच्या मंडळींचं भयंकर रुप समोर आलं आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 

नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; बेदम मारहाण करत पाजलं अ‍ॅसिड; पत्नीची प्रकृती गंभीर

तीन लाखांचा हुंडा न दिल्याने पतीने पत्नीला अ‍ॅसिड पाजलं आहे. विवाहितेची प्रकृती अत्यंत गंभीर असून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीच्या आई-वडिलांनी हुंड्यासाठी आपल्या मुलीचा खूप छळ आणि बेदम मारहाण केल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच सासरच्या मंडळींनी पैशासाठी मुलीला खूप त्रास दिल्याचं म्हटलं आहे. विवाहितेवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी देखील याबाबत ट्विट केलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक