भादवण - हालेवाडी ता आजरा . येथे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या लक्ष्मी मंदिरात अज्ञाताने मंदिरांचे दरवाजे उचकटून धाडसी चोरी केली असून अज्ञात चोरट्याने देवीचे दागिने रोख रक्कम व मंदिरातील सी सी . टीव्ही फुटेज लंपास केले आहे . अज्ञात चोरट्या विरोधात आजरा पोलिसात सुनिल शिवाजी पाटील वय ४२ रा. हालेवाडी ता आजरा, यांनी वर्दी दिली आहे.
गावात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी देवीची पुजा करण्यासाठी पुजारी सुनिल पाटील आले असता दरवाजा उचकटलेला दिसला . देवीच्या अंगावर घालण्यात आलेले दागिन नसल्याचे पाटील यांच्या निर्दनास आले . त्यांनी तातडीने पोलिसांन व ग्रामस्थांना माहिती दिली .सकाळी गावात ही घटना समजताच एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असता मंदिरातून ३ लाख किंमतीचे सोन्याचे घंटन एक, साडेसात तोळे वजनाचे काळे मणी सोन्याचे पटटी व मध्यभागी सोन्याचे पेंडल . एक लाख किंमतीचे सोन्याचा मंगळसुत्र एक, २५ तोळे वजनाचा त्यास काळे मणी व सोन्याचा पट्टा . एक लाख रु किंमतीचा अडीच तोळ्याचा सोन्याचा नेकलेस एक, . साठ हजार रुपयांची सोन्याची कर्णफुले व पन्नास हजार रुपयांचा सी . सी टीव्ही व मशिन असा सहा लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
दरम्यान चोरीचा तपास करण्यासाठी कोल्हापूर येथून श्वान पथक मागवण्यात आले या श्वानाने हालेवाडी - आर्दाळ या नवीन मार्गावर थोडे आंतर जाऊन घुटमळले . या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले . सहाय्यक पोलिस उप निरीक्षक सुनिल हारुगडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तानाजी जाधव . सागर पाटील . सहाय्यक फौजदार बी एस . कोचरगी , निरंजन जाधव. राजेश आबुंलकर . अमोल पाटील , संदीप म्हसवेकर यांनी भेट दिली .