शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

Crime News: अनैतिक संबंधांच्या संशयाचे भूत सासऱ्याच्या डोक्यात शिरले, सुनेसह पाच जणांना संपवले, नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 11:03 AM

Crime News: अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका व्यक्तीने पाच जणांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. हत्या झालेल्यांमध्ये दोन मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

गुरुग्राम (हरियाणा) - हरियाणामधील गुरुग्राम येथून मनाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका व्यक्तीने पाच जणांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. (Crime News) हत्या झालेल्यांमध्ये दोन मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. ही घटना राजेंद्र पार्कमध्ये घडली आहे. येथे एका घरमालकाने त्याची सून, भाडेकरू, भाडेकरूची पत्नी आणि त्यांच्या मुलांची हत्या केली आहे. (Suspicion of immoral relationship, father-in-law kills five people including daughter-in-law )

हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात दाखल झाला  आणि त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आरोपीला त्याची सून आणि भाडेकरूमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने हे हत्याकांड घडवून आणले. त्यानंतर राव राय सिंह नावाचा हा आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचला. आता पोलिसांनी त्याला अटक करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

आरोपी सासरा हा निवृत्त सैनिक असल्याचे सांगण्यात येत आहे.  सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिसरात त्याची ओळख आहे. तसेच त्याला ट्रीमॅन म्हणून ओळखले जाते. दरम्यान, पोलीस तपासामध्ये एका खाजगी बँकेत काम करणाऱ्या कृष्णा तिवारीसह एकूण ५ जणांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.

आरोपी राव राय सिंह हा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने पाच जणांची हत्या केल्याचा जबाब दिला. त्यामध्ये त्याच्या सुनेचाही समावेश होता. त्याचे बोलणे ऐकून पोलिसांना धक्का बसला. आरोपीला त्याची सून आणि भाडेकरूमध्ये अफेअर असल्याची शंका होती. त्यातूनच त्याने या हत्या केल्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणा