नवी दिल्ली - राजस्थानमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घ़डली आहे. उदयपूरच्या संभागमध्ये एक भयंकर प्रकार समोर आला आहे. महिलेने दुसरं लग्न केलं म्हणून पती-पत्नीला गावासमोर तालिबानी शिक्षा देण्यात आली आहे. पंचांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर या जोडप्याला गावासमोरच अमानूष मारहाण करण्यात आली. त्यांना सुरुवातीला दोरीने बांधून ठेवण्यात आलं आणि नंतर भयंकर शिक्षा देण्यात आली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळाळेल्या माहितीनुसार, एका महिलाने आपल्या पहिल्या पतीला सोडून दुसरं लग्न केलं होतं. पण तिच्या सासरच्या मंडळींना हे आवडलं नाही. ते महिला आणि तिच्या दुसऱ्या पतीला गावी घेऊन आले. या पंचांनी शिक्षेचा तालिबानी निर्णय सुनावला. यानंतर महिला आणि दुसऱ्या पतीला दोरीने बांधून ठेवण्यात आलं. तसेच दोन तासांपर्यंत दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. पंच आणि समाजाच्या भीतीने कोणीच काही बोलायला तयार नाही. तसेच मदतीसाठी देखील पुढे आलं नाही.
जोडप्याने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. एक महिन्यापूर्वी महिलेने दुसरं लग्न केलं होतं. तिच्या पतीने सांगितलं की, आम्ही बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखतो. लग्नानंतर मी पत्नीसह माझ्या घरी राहत होतो. यादरम्यान 11 जानेवारी रोजी महिलेचा पहिला पती आणि काही जणं घरी आले आणि ते जबरदस्तीने आम्हाला घेऊन गेले. यानंतर आम्हाला दोरीने बांधून मारहाण करण्यात आली.
दोन तास मारहाण केली जात होती. पंचांच्या उपस्थिती मारहाण करण्यात आली. याशिवाय पंचांनी दोघांवर 40 हजार रुपयांचा दंड सुनावला. समाजाच्या भीतीने दोघेही 6 दिवस शांत होते. मात्र यानंतर दोघांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. यामध्ये दोघांना मारहाण केल्याचं दिसून येत नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.