नवी दिल्ली - दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थांला वर्गात नीट बसण्याचा सल्ला देणं शिक्षकाला चांगलंच महागात पडलं आहे. संतापलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याने लोखंडी रॉडने शिक्षकाचं डोकंच फोडल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या बपरोला गावामध्ये एका विद्यार्थ्याने थेट शिक्षकावरच हल्ला केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला. ज्यामध्ये फोन करणाऱ्या व्यक्तीने एका विद्यार्थ्याने शिक्षकावर हल्ला केल्याचं सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
शिक्षकाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विक्रांत असं शिक्षकाचं नाव असून त्यांना राठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते बपरोला येथील एका सरकारी शाळेत शिकवतात. विद्यार्थ्याला वर्गात नीट बसण्याचा सल्ला दिला होता. त्याचाच राग त्याच्या मनात होता. त्यामुळे त्याने सकाळी येऊन लोखंडी रॉडने हल्ला केला. ललीत असं या 21 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून तो दोन वेळा बारावी नापास झाला आहे. आता पुन्हा एकदा तो बारावीचा अभ्यास करत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
संतापजनक! मुख्याध्यापकाचं विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन; घरच्यांनी शिकवला चांगलाच धडा, केली यथेच्छ धुलाई
बिहारमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचं उघड झालं आहे. विद्यार्थिनीची छेड काढणं मुख्याध्यापकाला चांगलंच महागात पडलं आहे. नागरिकांनी ही घटना समोर आल्यानंतर त्याची यथेच्छ धुलाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापकावर आपल्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मुख्याध्यापकाला अटक करण्यात त्यांना यश आलं आहे.
जिल्ह्यातील सीमापूर परिसरातील पिपरी बहियार प्रायमरी स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या एका मुलीसोबत मुख्याध्यापकाने चुकीचं वर्तन करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या गालाचा चावा घेतला. यामुळेच मुलगी जोरात किंचाळली. आरडाओरडा करू लागली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोक रुमच्या दिशेने आले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.