भोपाळ - मध्य प्रदेशमधील अलिराजपूरमध्ये एका महिलेसोबत सरकारी शाळेतील गुरुजी अय्याशी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ सरकारी अधिकाऱ्यांनाही मिळाला तेव्हा त्यांना धक्का बसला. हा व्हिडीओ तीन दिवसांपूर्वीचा आहे. तसेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जोबत बीडीओंनी संबंधित शिक्षकाला निलंबित केले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जाईल, त्यानंतर जी विभागीय कारवाई होईल, ती केली जाईल. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांकडेही चौकशी केली. मात्र त्यांनी काही सांगितले नाही. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महिलेसोबत अय्याशी करताना दिसलेला शिक्षक हा सेवरिया गावातील एका वसतीगृहाचा अधीक्षक आहे. त्याचं नाव दीपसिंह चमका असं आहे. अधिकाऱ्यांनी व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेची ओळखही पटवली आहे. मात्र तिचं नाव उघड केलेलं नाही. कुठल्यातरी व्यक्तीला सदर महिला आणि शिक्षकाबाबत संशय होता. मात्र त्याच्याकडे कुठलाही पुरावा नव्हता. दरम्यान, हा व्हिडीओ पूर्ण योजनाबद्ध पद्धतीने बनवण्यात आला असावा, असे सांगण्यात येत आहे.
मोबाईलमध्ये हा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्याचा हेतू स्पष्ट झालेला नाही. मात्र ज्या पद्धतीने हा व्हिडीओ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ते पाहता पूर्ण योजनाबद्धरीतीने हा व्हिडीओ तयार करण्यात आला असल्याचा संशय येतो. हा व्हिडीओ पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. सुरुवातीला कुणाचाही त्यावर विश्वास बसला नाही. सर्वजण एकमेकांना दाखवून या व्हिडीओची खातरजमा करून घेऊ इच्छित होते. नंतर अधिकाऱ्यांनी विभागातील लोकांकडे आणि बालवसतीगृहातही याबाबत चौकशी केली. त्यामधून सदर व्हिडीओ खरा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या शिक्षकाला निलंबित करण्यात आले.
१७ ऑगस्ट रोजी यासंदर्भातील व्हिडीओ लोकांनी सोशल मीडियावर पाहिल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. गावातील प्रत्येक व्यक्तीने हा व्हिडीओ एकमेकांना दाखवला. त्यानंतर तो व्हिडीओ गावाबाहेरही पसरला. मात्र ग्रामस्थांनी या व्हिडीओबाबत मौन पाळले आहे. ग्रामस्थांनी संबंधित महिलेचा विचार करून मौन पाळले आहे.