नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदूरमधील छावणी भागात राहणाऱ्या एका जिम ट्रेनर असलेल्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जिम ट्रेनरच्या खोलीत पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली आहे. ज्यामध्ये त्याने अंत्यसंस्कार करताना त्याच्या असणाऱ्या काही इच्छा लिहिल्या आहेत. तरुणाने आपल्या सुसाईड नोटमध्ये "आपल्या दोन्ही चुलत बहिणींना माझा चेहरा दाखवू नका. तसेच प्रेयसीलादेखील अंत्यसंस्कारात सहभागी करून घेऊ नका. जर माझी ही शेवटची इच्छा पूर्ण झाली नाही तर माझी आत्मा भटकत राहील" असं म्हटलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण हा जिम ट्रेनरचं काम करत होता. रविवारी सकाळी त्याचा भाऊ काही कारणामुळे त्याच्या खोलीत गेला होता. त्यावेळी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पाहिला. यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. लॉकडाऊनमुळे काही दिवसांपूर्वी तरुणाने काम सोडलं होतं. तपासानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, संपत्तीवरून कुटुंबात वाद सुरू होता. यामध्ये तो चुलत बहिणींवर निराश झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. यामध्ये त्याने स्वत:च्या इच्छेने आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आहे. मी जे काही करीत आहे ते आनंदाने करत आहे असं देखील तरुणाने म्हटलं आहे. मृत व्यक्तीचा भाऊ अंकुशने दिलेल्या माहितीनुसार, गोलू आणि मन्नू त्यांच्या सख्खा बहिणी नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या कुटुंबात वाद सुरू आहे. या वादात त्याच्या दोन्ही चुलत बहिणी हस्तक्षेप करीत होती. या कारणामुळेच तरुणाने सुसाईड नोटमध्ये असं काहीसं लिहिलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हृदयद्रावक! कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू, विरह सहन न झाल्याने पतीची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पतीने देखील आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र पत्नीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात असलेल्या पतीने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या होशंगाबादमध्ये राहणाऱ्या एका वकिलाच्या पत्नीला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. मात्र पत्नीच्या मृत्यूचा मोठा मानसिक धक्का बसल्याने वकील नैराश्यात गेले होते. त्यानंतर त्याने गोळी झाडून आत्महत्या केली आहे.