हरियाणामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रेवाडीच्या धरुहेरा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत पत्नी आणि तिच्या प्रियकराने प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बावल परिसरातील गावातील रहिवासी महिपाल यांनी सांगितले की, तो एका खासगी कंपनीत बसचालक आहे. सुमारे ४ महिन्यांपासून तो धरुहेरा येथील सेक्टर-४ मध्ये भाड्याच्या घरात राहत होता. महिपालचा आरोप आहे की, त्याची पत्नी शीतलचे गुरुग्राममधील जमालपूर येथील पवनसोबत प्रेमसंबंध आहेत. हा प्रकार त्याला समजल्यानंतर त्याने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नीने पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. 'महिनाभरापूर्वी आरोपी पवनने त्याला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप पतीने केला आहे.
मांडूळ विक्रीचा सौदा फिसकटला; मालेगावात गोळीबार करत खुनाचा प्रयत्न
'१० मार्च रोजी पत्नी शीतल या दोन्ही मुलींना सोबत घेऊन माहेरच्या घरी निघून गेल्या होत्या. मी स्वत: त्यांना धरुहेरा बसस्थानकावर सोडण्यासाठी गेलो होतो, पण पत्नी तिच्या माहेरच्या घरी गेली नाही, तर गुरुग्राममधील सोसायटीच्या फ्लॅटमध्ये आरोपी पवनजवळ राहायला गेली. फोन केला असता पत्नीने फोन घेतला नाही. रात्री फोन केला असता फोन बंद होता. मेव्हण्याला फोन करून पत्नीबाबत विचारणा केली असता त्यांनीही प्रतिसाद दिला नाही, अशी माहितीी पतीने पोलिसांना दिली.
'संध्याकाळी उशिरा पती खोलीत आराम करत होता, त्याच दरम्यान दोन तरुण त्यांच्या खोलीत पोहोचले. एका तरुणाने पती महिपालचे पाय धरले, तर दुसऱ्याने त्याच्यावर जबरदस्ती केली. यानंतर एका आरोपीने चाकूने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न केला, या हल्ल्यात त्याचा रक्तस्त्राव झाला. आरोपीने त्याच्या हातावरही चाकूने वार केले. दरम्यान आरोपी पळून गेले.
महिपालने मित्र राहुलच्या मदतीने रेवाडीतील ट्रॉमा सेंटर गाठले. माहिती मिळताच सेक्टर-६ पोलीस स्टेशनही घटनास्थळी पोहोचले. तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नी शीतल, प्रियकर पवन आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.