नवी दिल्ली - नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेमप्रकरणातून मुलीच्या कुटुंबीयांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या भावांनी आपल्या बहिणीवर थेट गोळ्या झाडल्या आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी एका तरुणीने प्रेमविवाह केला होता. यामुळे कुटुंबीय नाराज झाले होते. तिचे भाऊ या घटनेने खूपच जास्त संतापले होते. याच रागाच्या भरात भावांनी 21 वर्षीय तरुणीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
बदायूचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक ओपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोअज्जम आणि मुजिम असं या आरोपी भावांचं नाव आहे. त्यांनी आपल्या बहिणीची गोळ्या झाडून हत्या केली. तरुणी आपला पती फहीमसोबत बाहेर गेली होती. तिला त्याच्यासोबत पाहताच भावांना खूप राग आला. तरुणीने 18 महिन्यांआधीच आपल्या आई-वडिलांच्या, भावांच्या आणि नातेवाईकांच्या विरोधात जाऊन फहीमसोबत लग्न केलं. यामुळे कुटुंबीय खूप नाराज झालं होतं. तरुणीबद्दल त्यांच्या मनात खूप राग निर्माण झाला होता.
तरुण आपल्या पतीसोबत औषध घेण्यासाठी आपल्या गावातून बदायू येथे गेली होती. बाजारातून ती पुन्हा आपल्या घरी परतत होती. तेव्हाच तिच्या भावांनी तिला रस्त्यात पाहिलं आणि त्यांनी तिच्यावर गोळीबार केला. यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस लवकरच आरोपींना शोधून अटक करतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.