नवी दिल्ली - आसामच्या सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी सतर्कता आणि भ्रष्ट्राचार विरोधी संचालनालयाकडून अभियान सुरू आहे. बुधवारी टीमने कछार जिल्ह्याच्या लखीपूर वन मंडलच्या रेंजरला लाचदेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. छापेमारीची माहिती मिळताच रेंजर आपल्या ऑफिसातून पैसे घेऊन पळू लागला. मात्र टीमच्या काही जणांनी रेंजरला पकडलं आणि तातडीने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आसाम कछार जिल्ह्यातील लखीपूर वन मंडलमधील रेंजर देवव्रत गोगोई यांच्यावर जंगलातील संसाधनांच्या तस्करीच्या बदल्यात एका व्यापाऱ्याकडून कथितस्वरुपात लाच घेण्याचा आरोप केला जात होता. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर रेंजरला रंगेहाथ पकडण्यात आलं. छापेमारीचं वृत्त मिळताच रेंजर गोगोई आपल्या कार्यालयातून लाचेची रक्कम घेऊन पळून जाऊ लागला.
साधारण 1 किलोमीटरपर्यंत पाठलाग केल्यानंतर टीमला त्याला पकडण्यात यश आलं. देवव्रत गोगोईने पळ काढण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र शेवटी भ्रष्ट्राचार विरोधी टीमने त्याला पकडलं. आसाम पोलिसांच्या विशेष महानिर्देशक जीपी सिंह यांनी या अभियानाबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. सध्या रेंजर गोगोईची चौकशी केली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.