भोपाळ - मध्य प्रदेशमधीली रीवा पोलिसांनी गुलामुद्दीन उर्फ मंजू हत्याकांडाचा उलगडा केला आहे. या व्यक्तीची हत्या त्याची पत्नी, तिचा भाओजी आणि भाच्याने केली होती. मृत व्यक्ती पहिल्या पत्नीला संपत्तीमध्ये वाटा देत नव्हता. त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आली. मृत व्यक्तीने दुसरे लग्न केले होते. त्यानंतर काम करण्यासाठी तो जम्मू काश्मीरमध्ये गेला होता. तो गावात परतल्यावर त्याला वाटेतून हटवण्यासाठी आरोपींनी त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपींना गुन्हा कबूल केला असून, आरोपींनी हत्या केल्यानंतर मृतदेह विद्रुप केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार २३ मे रोजी काही लोक नईगडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सिगदहा पुलावरून जात होते. तेव्हा त्यांना पाण्यामध्ये एक मृतदेह दिसला. त्यांनी आरडाओरडा करून गाववाल्यांना जमा केले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची तपासणी केली. या मृतदेहाच्या शरीराचे अनेक भाग कापलेले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टेमसाठी पाठवला.
पोलिसांनी संपूर्ण परिसरात चौकशी केली. तसेच आजूबाजूच्या लोकांकडेही विचारणा केली. दरम्यान, कुणीतरी हा मृतदेह ओळखला. त्याने पोलिसांना मृताचं नाव गुलामुद्दीन उर्फ मंजू असल्याचे सांगितले. पोलिसांनी सांगितले की मृताची ओळख मोज्यावरून पटली. नातेवाईकांनी त्याचे मोजे ओळखले. त्यानंतर पोलिसांनी तपास अधिक वेगवान केला. दरम्यान, पोलिसांना मृताच्या पहिल्या पत्नीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर हळूहळू संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला.
या हत्याकांडाबाबत रीवा जिल्ह्याचे एसपी नवनीत भसीन यांनी सांगितले की, नईगडी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रांतर्गत पुलावर मिळालेल्या मृत व्यक्तीची हत्या ही अन्य कुणी नाही तर त्याची पत्नी आणि तिचा भाचा आणि भाओजींनी केली होती. पोलिसांनी सांगितले की, मृत व्यक्ती आणि त्याची पत्नी १२ वर्षांपासून वेगळे राहत होते. तसेच पती तिला संपत्तीमध्ये वाटा देत नव्हता. त्यामुळे पत्नीने भाचा आणि भाओजीसोबत मिळून त्याची हत्या केली.