नवी दिल्ली - पतीच्या छळाला कंटाळून एका महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नवऱ्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळलेल्या महिलेने स्वत:ला संपवलं असून तिच्या सुसाईड नोटने एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने सुसाईड नोटमध्ये मुलीला पोलीस अधिकारी बनवायचं स्वप्न होतं पण ते स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याचं तिला दु:ख असल्याचं म्हटलं आहे. तसेच तिच्या मृत्यूसाठी तिने पतीला जबाबदार धरले आहे.
आपल्या मुलीला पतीपासून दूर ठेवा आणि पतीला कठोरातील कठोर शिक्षा करा असं देखील महिलेने म्हटलं आहे. मद्यपी पती आपली पत्नी आणि लहान मुलीला रोज मारहाण करून त्रास देत असे. मुलीला पोलिसात भरती करण्याचे आईचे स्वप्न होते, पण ते पूर्ण होऊ शकले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पतीविरुद्ध एफआयआर दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेने कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्नाव सदर कोतवाली परिसरातील मोहल्ला पुरानी बाजार येथे राहणारा मोहित गुप्ता याचे आराधना गुप्तासोबत 2015 मध्ये लग्न झाले होते. दारूच्या नशेत पती पत्नी आणि मुलीला रोज मारहाण करायचा. रोजच्या भांडणाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी पतीला जबाबदार धरण्यात आले आहे. आपल्या मुलीला पोलीस करण्याचं महिलेचं स्वप्न होतं.
मुलगी इक्षा हिने दिलेल्या माहितीने सर्वांना धक्का बसला आहे. वडिलांनी आईची हत्या केली, नंतर तिला फासावर लटकवले, असे इशाने सांगितले आहे. मुलीच्या साक्षीचाही तपास पोलीस करत आहेत. महिलेने पाच वर्षांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. तिला पोलीस अधिकारी बनवायचं होते, त्यासाठी ती स्वत: तिला शिक्षण देत होती. मात्र, पतीच्या छळामुळे तिने गळफास लावून घेतला. आपल्या आईचं स्वप्न नक्की पूर्ण कर. मला माफ कर मी फक्त तुझ्यासाठी जगत होते असं देखील महिलेने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.