शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Crime News: मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे प्रलाेभन दाखवून तरुणाची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 10:58 AM

Crime News: मुंबई महापालिकेत नोकरी लावताे असे सांगून नियुक्तीचे बनावटपत्र देऊन २२ वर्षीय तरुणाची आठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अंजली राजाराम मुनेश्वर हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर : मुंबई महापालिकेत नोकरी लावताे असे सांगून नियुक्तीचे बनावटपत्र देऊन २२ वर्षीय तरुणाची आठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अंजली राजाराम मुनेश्वर हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने अन्य काेणाला फसविले काय? याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.उल्हासनगर मराठा सेक्शन परिसरात राहणारी अंजली हिने आशेळेगावात राहणाऱ्या गिरीश पवार व त्याचा चुलत भाऊ जगदीश पवार यांना संदीप बाविस्कर नावाची व्यक्ती मुंबई महापालिकेत नोकरी लावू शकते, असे सांगितले. ६ एप्रिल २०२१ ते २४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान त्यांना बनावट नियुक्तीपत्र देऊन गुगल पेद्वारे व वेगवेगळ्या बँक खात्यांत आठ लाख रुपये घेतले. नियुक्तीपत्रावर मुंबई महापालिकेचे खोटे शिक्के व खोटी सही हाेती. हे पत्र घेऊन गिरीश मुंबई पालिकेच्या कार्यालयात गेला असता ते बनावट असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गिरीश याने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पाेलिसांनी अंजली मुनेश्वर हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असून या महिलेने आणखी कुणाला फसविले आहे का याचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी