शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

क्राईम थ्रीलर : मुंबईतल्या गाॅडमदर  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 11:18 AM

जेनाबाई आणि त्यानंतरही आजवर सुरू असलेल्या अनेक महिला डॉनच्या कारवायांनी मुंबई पोलिसांना हैराण केले आहे.

- रवींद्र राऊळ, वृत्तसंपादक

तब्बल पन्नास कोटींचा सौदा करणाऱ्या महिला ड्रग माफियाला डोंगरीत झालेली अटक, हा सध्या चर्चेचा विषय आहे; पण याच डोंगरी भागातून अंडरवर्ल्डवर राज्य करणारी महाधूर्त आणि कारस्थानी झैनाब ऊर्फ जेनाबाई कधीच विस्मृतीत गेली आहे. जेनाबाई आणि त्यानंतरही आजवर सुरू असलेल्या अनेक महिला डॉनच्या कारवायांनी मुंबई पोलिसांना हैराण केले आहे.

कोट्यवधी रुपये कमवूनही शेवटपर्यंत डोंगरीतल्या चुनावाला बिल्डिंगमधील लहानशा खोलीत राहणाऱ्या जेनाबाईचा शब्द मोडायची हिंमत १९८० च्या दशकात अंडरवर्ल्डमध्ये कुणातच नव्हती; कारण माफिया डॉन हाजी मस्तान तिला बहीण मानायचा. त्यामुळे ती अंडरवर्ल्डचीच आपा होती. करीम लालापासून ते युसूफ पटेलपर्यंत सारेच जेनाबाईचा मान राखायचे. दाऊद इब्राहिमची तर ती मानलेली मावशीच होती. हलाखीच्या दिवसांत तिने धान्याचा काळाबाजार केला. त्याच दरम्यान सीएसटीजवळील एका दर्ग्यात तिची माफिया डॉन वरदराजन मुदलीयारशी ओळख झाली आणि ती दारूच्या धंद्यात ओढली गेली. तिला ‘मिसा’खाली अटक करण्यात आली; पण तिच्याविरुद्ध पुरावे कधीच सापडू शकले नाहीत. त्यामुळे तिला सोडून देण्यात आले.

अंडरवर्ल्डमध्ये तिच्या शब्दाला इतका मान होता की, दाऊद गँग आणि पठाण गँग एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायला टपलेली असताना तिने हाजी मस्तानच्या सांगण्यावरून दोन्ही टोळ्यांमध्ये समेट मिळवून आणला होता. मुंबईतील झाडून सारे गँगस्टर हजर असलेल्या हाजी मस्तानच्या बंगल्यावरील त्या बैठकीला केवळ जनाबाई ही एकमेव महिला होती. लहानपणापासून दाऊदच्या कारवाया सांभाळून घेणाऱ्या जेनाबाईमुळे दाऊदची पोलिसांमध्ये मोठी सेटिंग फिट झाली; कारण जनाबाई पोलिसांची खबरीही होती.

कालांतराने सगळ्या टोळ्या आक्रमक होत गेल्या आणि जेनाबाईची जरब कमी होत गेली. १९९३ च्या जातीय दंगलीत शांती मोर्चा काढताना लोकांनी तिला पाहिले होते. आपल्या मुलाच्या हत्येने ती खचली आणि अंडरवर्ल्डपासून कायमची दूर झाली. नंतर तिचे निधन झाले. एकूणच बेदरकार, उलट्या काळजाच्या समजल्या जाणाऱ्या गुंडांच्या अंडरवर्ल्डमध्ये महिला डॉनही काही मागे नाहीत, हेच आजवरचा त्यांच्या कारवायांमधून दिसून येते.

कामाठीपुराची सम्राज्ञी... गंगू काठियावाडी जेनाबाईच्याच काळातील गंगू काठियावाडी ही कामाठीपुराची सम्राज्ञी. विवाहाचे वचन देऊन मुंबईच्या कुंटणखान्यात विक्री झालेल्या गंगूबाईला रेडलाइट एरियातील सेक्स वर्कर आपली आई मानतात आणि तिच्या तसबिरीची पूजाही करतात. सेक्स वर्करवर होणाऱ्या अन्यायाबाबत तिने कायम आवाज उठवला आणि आझाद मैदानावर मोर्चाही काढला. ‘तुम्ही मला मिसेस नेहरू बनवायला तयार असाल तर मी धंदा सोडून देईन’, असे तिने बेडरपणे पंडित नेहरूंना सुनावले होते.

हसीना परकार... एक काळ गाजवलादाऊदची बहीण हसीना परकार हिनेही एक काळ गाजवला. नागपाड्यातील तिच्या दरबारात हजेरी लावून गाऱ्हाणी मांडणाऱ्यांची नावे पाहिली तर अनेकांची छाती दडपून जाई. ड्रग विक्रीत तर महालक्ष्मी पापामणीपासून वरळीची शकुंतला ऊर्फ बेबी पाटणकरपर्यंत अनेक महिलांनी पोलिसांना जेरीस आणले. के. टी. थापाची बहीण ‘दीदी’ या नावाने अंडरवर्ल्डमध्ये ओळखली जायची. छोटा राजनची पत्नी सुजाता हिलाही पोलिसांना अटक करावी लागली होती. अबू सालेमची एकेकाळची पत्नी अभिनेत्री मोनिका हिचाही दबदबा होता.

दाऊदच्या साम्राज्याला सपनाचे हादरे अशरफ हे लेडी डॉनमधील आणखी एक नाव. मेहमूद खान या गुंडाची मुंबई विमानतळावर हत्या झाली होती. ही हत्या दाऊदनेच घडवून आणल्याची खात्री त्याची पत्नी अशरफला होती. आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अशरफ लेडी डॉन झाली.  आपले नाव बदलून तिने सपना ठेवले आणि बघता-बघता दाऊदच्या साम्राज्याला हादरे द्यायला सुरुवात केली. अंडरवर्ल्डमध्ये तिने बरीच खिंडारे पाडली. मध्यरात्र उलटल्यानंतर अंधाऱ्या गल्लीबोळांत फिरून ती बातम्या मिळवायची आणि पोलिसांपर्यंत पोहोचायची.  पोलिसांची बक्षिसी घ्यायलाही ती कधी पुढे आली नाही. सपना आपल्याला महागात पडणार हे हेरून दाऊदने हस्तकांना आदेश दिला आणि सपनाची बावीस वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी