शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

जानूझ प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपविले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 9:13 PM

तपास काम क्राईम ब्रँचकडे सोपविण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्याकडे रविवारी मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी तसा आदेश महासंचालकांनी जारी केला आहे. या प्रकरणाचा तपास निरीक्षक राहूल परब यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

पणजी - गोमेकॉतील शवागारातून गायब झालेल्या जानूझ गोन्साल्वीस यांच्या मृतदेहाच्या प्रकरणाचा तपास  शेवटी पोलीस खात्याने गुन्हा अन्वेषण विभागाकडे (क्राईम ब्रँच) सोपविला. सोमवारी पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी असा आदेश जारी केला. 

तपास काम क्राईम ब्रँचकडे सोपविण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्याकडे रविवारी मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी तसा आदेश महासंचालकांनी जारी केला आहे. या प्रकरणाचा तपास निरीक्षक राहूल परब यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.  अंत्यसंस्कारासाठी शवागरात राखून ठेवलेल्या जानूझच्या मृतदेहाची फॉरेन्सीक विभागाच्या अधिकाºयाच्या निष्काळजीपणामुळे विल्हेवाट लावली गेल्यामुळे जानूझच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. या प्रकरणात जानूझच्या भावाकडून आणि नंतर गोमेकॉ प्रशसनाकडूनही  अगशी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली होती. या प्रकरणात गोमेकॉच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख एडमंड रॉड्रिगीश व इतर दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध आगशी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यातही आला होता. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून प्रकरण ज्येष्ठ अधिकाऱ्याकडेच देण्यात यावे असा आरोग्य मंत्र्यांचा आग्रह होता. त्यामुळेच ते क्राईम ब्रँचला सोपविण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी