नागपूर : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कारागृह परिसरातून पळून गेलेला अट्टल गुन्हेगार साईमन फ्रॉन्सिस अँथोनी याच्या रविवारी रात्री पोलिसांनी मुसक्या बांधल्या. गिट्टीखदान परिसरात तो एका नातेवाईकाकडे लपून बसला होता.
आरोपी साईमन केवळ १८ वर्षांचा आहे. मात्र तो सराईत गुन्हेगार आहे. त्याला अजनी पोलिसांनी २७ ऑगस्टला दुचाकी चोरीच्या आरोपात अटक केली होती. २८ ऑगस्टला न्यायालयात हजर करून त्याचा पोलिस कस्टडी रिमांड मिळवला होता. रिमांड संपल्यामुळे त्याला पोलिसांनी रविवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे रविवारी सायंकाळी ६.१५ ला अजनी पोलीस आरोपी साईमनला घेऊन मध्यवर्ती कारागृहाच्या समोर निर्माण करण्यात आलेल्या मंगलमूर्ती लॉनमधील तात्पुरत्या कारागृहात पोहोचले. त्याला कारागृहात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, पोलीस गाफील असल्याची संधी साधून साईमनने धूम ठोकली. तो पळत असल्याचे पाहून अजनी तसेच कारागृह पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र तो गल्लीतून अंधाराचा फायदा घेत पळून गेला. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. अजनीचे ठाणेदार प्रदीप रायनावार यांनी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहर तसेच जिल्हा पोलीसांना ही माहिती दिली. त्यामुळे शहरातील सर्व ठाण्यातील पोलिस पथके आरोपीचा वेगवेगळ्या भागात शोध घेऊ लागले.खबर्याने दिली टीपरात्री पोलिसांनी गुन्हा दाखल करून खबऱ्यांना कामी लावले. आरोपी साईमनचे नातेवाईक गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. तिकडे तो दिसल्याची टीप खबऱ्याने दिली. ते कळताच पोलिसांचा ताफा तिकडे धावला. त्यांनी पोलिसांच्या मदतीने साइमनच्या नातेवाईकाकडे जाऊन रात्री ११.३० च्या सुमारास त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याला मध्यरात्री पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पळून गेलेला आरोपी सापडल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पोलिसांवरचे संकट टळलेया घटनेमुळे पोलिसांवर मोठे दडपण आले होते. साईमनला कारागृहात नेणाऱ्या पोलिसांना निलंबनाच्या कारवाईचा धाक वाटत होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, ३५ हजार पोलिसांचा फ़ौजफाटा तैनात
सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट
संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती
जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता