संग्रामपूर - मध्य प्रदेशासह महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्टेशन वर चोऱ्या व लुटमार करणारा सराईत गुन्हेगार इटारसी येथील जी आर पी पोलीसांच्या जाळ्यात अडकला आहे. रेल्वे पोलिसांनीअटकेत असलेल्या आरोपीला घेऊन गुरुवारी सकाळी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलिस स्टेशन गाठले. सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या ग्राम चिचारी येथील एकाच्या घरावर छापा मारून ताब्यात घेतले आहे.
इटारसी जिल्हा होशंगाबाद येथील जी आर पी पोलीसांनी अटक केलेल्या संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील सराईत गुन्हेगार नब्बु गुलाब तायडेला घेऊन गुरुवारच्या पहाटे सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम चिचारी येथे धडकली. येथील मुस्लीम नामक इसमास संशयावरून वरून ताब्यात धेऊन तपास कामी इटारसी येथे नेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेला इसम चोरलेली वस्तू, दागिणे घेत असल्याचे बयान अटकेतील आरोपीने दिले आहे. अटकेत असलेला सराईत गुन्हेगार नब्बू तायडे वर सर्वाधिक चोरीचे गुन्हे भुसावळ रेल्वे पोलिसांनी दाखल केले असून त्याच्यावर मध्य प्रदेशातील खंडवा, इटारसी तसेच महाराष्ट्रातील भुसावळ ,जळगाव खान्देश, अकोला, कल्याण , ठाणे, औरंगाबाद आदी शहरातील रेल्वे स्टेशनवर चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. विविध शहरातील रेल्वे पोलिसांना हुलकावणी देणारा आरोपी अखेर इटारसी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मुख्य आरोपी नब्बू तायडे याचे मूळ गाव जळगाव जा. तालुक्यातील इस्लामपूर आहे .मात्र तो कित्येक वर्षापासून सासरवाडी चिचारी येथे राहतो. रेल्वेत महीलांचे दागिने लूटने, सुटकेस बॅग पळविने, पाकीटासह लेडीज पर्स मारणे असे अनेक प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. सराईत गुन्हेगार नब्बू गुलाब तायडे गेल्या अनेक दिवसा पासून इटारसी रेल्वे पोलीसांच्या अटकेत आहे. या आरोपीला घेऊन इटारसी रेल्वे स्टेशन पोलीस मधील एस. आय. के. एम. रिठारिया , के . के . पांडे , अब्दुल शारिक, हेड कॉन्स्टेबल के. के. यादव यांनी सोनाळा पोलीस स्टेशन मधील पोलिस शिपाई सचिन राठोड ला सोबत धेऊन चिचारी येथील मुस्लिम नामक इसमास ताब्यात घेतले. यावेळी घरात छापा मारला असता काही आढळून आले नाही. मुख्य आरोपी नब्बू तायडे वर मध्यप्रदेशातील इटारसी रल्वे पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जा. पोलीस स्टेशन हद्दीत एकाला नोटीस
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीतील चिचारी येथील एका इसमाला ताब्यात घेऊन मध्य प्रदेशातील पोलिसांनी जळगाव जा. पोलीस स्टेशन हद्दीतील इस्लामपूर येथे धडक दिली. येथील एकाला नोटीस देऊन इटारसी पोलीस स्टेशन मध्ये हजर होण्याचे बजावले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून या सराईत गुन्हेगाराला इटारसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला घेऊन चिचारी येथील एकाला तपास कामी ताब्यात घेण्यात आले. तर इस्लामपूर येथील एकाला नोटीस बजावण्यात आली आहे. - के. के. यादव, हेड कॉन्स्टेबल, जीआरपी पोलिस, इटारसी मध्यप्रदेश