निर्दयी आया! २ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याच्या पोटात ठोसा मारला, मान पकडून केली मारहाण…

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 01:57 PM2022-06-15T13:57:26+5:302022-06-15T14:01:49+5:30

Cruelty : मुलाची बिघडलेली प्रकृती पाहून पालकांना संशय आल्यावर त्यांनी घरात सीसीटीव्ही लावले, त्यानंतर सीसीटीव्हीतील दृश्य पाहून पालकांचे हृदय हेलावले.

Cruel Aaya! 2 year old innocent kids punched in the stomach, grabbed by the neck and beaten… | निर्दयी आया! २ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याच्या पोटात ठोसा मारला, मान पकडून केली मारहाण…

निर्दयी आया! २ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याच्या पोटात ठोसा मारला, मान पकडून केली मारहाण…

googlenewsNext

मध्य प्रदेशातील जबलपूरमधील माढोताल पोलीस स्टेशन परिसरात स्टार सिटीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे नोकरदार जोडप्याने आपल्या 2 वर्षाच्या मुलाची काळजी घेण्यासाठी मोलकरीण (आया) ठेवली होती, तिला दरमहा 5 हजार रुपये आणि जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु ज्या मोलकरणीवर निरागस मुलाची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, निष्पाप मुलाला रानटी जनावराप्रमाणे वागवले. मुलाची बिघडलेली प्रकृती पाहून पालकांना संशय आल्यावर त्यांनी घरात सीसीटीव्ही लावले, त्यानंतर सीसीटीव्हीतील दृश्य पाहून पालकांचे हृदय हेलावले.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 4 महिन्यांपूर्वी जबलपूरमध्ये एका कुटुंबाने चमन नगर येथील रहिवासी रजनी चौधरी यांना दोन वर्षांच्या चिमुरडीची देखभाल करण्यासाठी ठेवले होते. आई आणि वडील दोघेही काम करतात. 2 वर्षाच्या चिमुरडीची काळजी घेण्यासाठी घरी कोणी नव्हते. आयाची निवड झाल्यानंतर सकाळी 11 वाजता आई-वडील तिच्यासाठी जेवण बनवून कामावर जायचे. यानंतर रजनी चौधरीने दोन वर्षांच्या निष्पाप बालकावर थर्ड डिग्री अत्याचार केला. मुलाची ढासळलेली प्रकृती पाहून पालकांना रजनीच्या वागण्याचा संशय आला. त्यांनी खोलीत सीसीटीव्ही लावले.


काही दिवसांपूर्वी निरागस बालक अत्यंत अशक्त दिसत असल्याने त्याला डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली असता, डॉक्टरांनी मुलाच्या आतड्याला सूज आल्याची माहिती दिली. बालकाची अशी अवस्था होण्यामागे कुठलातरी छळ असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. पालकांनी घरात बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता, रजनी चौधरीने मुलासोबत केलेल्या क्रूरतेचे आणि मारहाणीचे दृश्य पाहून त्यांचा पायाखालची जमीन सरकली.

या घटनेनंतर त्यांनी तात्काळ रजनी चौधरी विरुद्ध माढोतल पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी तात्काळ रजनी चौधरी यांच्या घरी जाऊन तिला अटक केली. एएसपी संजय अग्रवाल यांनी सांगितले की, आरोपी पोलिसांकडे आला आणि कलम 308 अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला तुरुंगात पाठवले. शहरांमध्ये विभक्त कुटुंबे वाढत आहेत आणि नोकरी करणारे पती-पत्नी बहुतेकदा आई किंवा बाई मुलांना सांभाळण्यासाठी ठेवतात, परंतु रजनीसारख्या लोकांचं मुलांबद्दलचे वागणे खूप धोकादायक ठरू शकते. मुलाचे पालक त्याच्यावर उपचार करत आहेत.

Web Title: Cruel Aaya! 2 year old innocent kids punched in the stomach, grabbed by the neck and beaten…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.