अहमदाबाद - ४८ वर्षीय एका महिलेने आपल्या २१ वर्षीय सावत्र मुलगा हार्दिक पटेल याची गळा आवळून हत्या केली. मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एका गोणीत भरून अहमदाबमधील दस्करोई तालुक्यातील कुंजड गावात फेकून दिला. गौरी पटेल असं या आरोपी महिलेचं नाव आहे. पोलिसांनी या महिलेने १५ वर्षांपूर्वी आपल्या ११ वर्षीय मुलाची देखील हत्या केली असल्याचे सांगितले. गौरीने ७ वर्षांपूर्वी हार्दिकचे वडील राजनीकांतशी लग्न केले.
हार्दिकचा लहान भाऊ उमंग पटेल कांभा भागात दुधाची डेअरी चालवतो. त्याने पोलिसांना जबाबात सांगितलं की, सावत्र आई गौरी आणि भाऊ हार्दिक नेहमी पैशांवरुन भांडण करीत होते. माझी सावत्र आई आमच्या डेअरी व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली नातेवाईक आणि वडिलांच्या मित्रांकडून पैसे उधार घेत होती. मात्र, हे पैसे तिने कधीच डेअरीसाठी खर्च केले नाही. उमंगने आरोप केला आहे की, गौरीने अशा प्रकारे पैसे जमवून नातेवाईकांकडून २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हार्दिकला कोरोना, लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे डेअरी व्यवसायाचे खूप नुकसान झाले होते. जेव्हा या नातेवाईकांनी पैसे परत मागितले तेव्हा नेमका प्रकार समोर आला.
मंगळवारी सकाळी हार्दिक घरात एकटा झोपलेला होता आणि उमंग डेअरीवर होता. गौरीने नाशिकमधील आपले तीन नातेवाईक संजय, अनिल, दिनेश यांच्यासह मिळून हार्दिकचा गळा आवळला. यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह एका गोणीत भरून फेकून दिला, अशी माहिती येथील पोलिसांनी दिली आहे. उमंग जेव्हा घरी परतला तेव्हा रात्री उशिरा हार्दिक घरी परतना नाही म्हणून त्याने गौरीकडे याबाबत विचारणा केली. मात्र तिने उत्तर दिलं नाही. यावेळी त्याने शेजारच्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की, गौरीचे तीन नातेवाईक एका गोणीत काही तरी भरून घेऊन जात होते. दरम्यान पोलिसांना कांभा येथील झुडपांमध्ये एक मृतदेह सापडला आणि हा हार्दिकच होता. या प्रकरणात गौरीची चौकशी केल्यानंतर तिने गुन्हा कबुल करत आपल्या तीन नातेवाईकांची नावं सांगितली.
पोलिसांच्या चौकशीत गौरीने आणखी एक धक्कादायक माहिती दिली. जेव्हा ती २०१४ साली नाशिकमध्ये काम करीत होती, तेव्हा तिने आपल्या ११ वर्षांच्या मुलाचीही हत्या केली होती. यावेळी पोलिसांना खोटं कारणं सांगून ती कशीबशी यातून सुटली होती. त्यानंतर २०१५ साली तिने दुसरं लग्न हार्दिकचे वडील रजनीकांत यांच्याशी केले.