इराणमध्ये दोषींना दिलेल्या क्रूर शिक्षेची चर्चा सध्या जगभरात पसरली आहे. या देशात ५१ जणांना अत्यंत भयंकर पद्धतीने मृत्यूची शिक्षा दिली आहे. जे ऐकून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल. या ५१ जणांवर केवळ विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप होता. शरिया कायद्यानुसार या शिक्षेला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. मृत्यूची शिक्षाही अशी जी विचार करूनही अंग कापेल. या ५१ जणांना दगडांनी ठेचून मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. इराणमधील मानवाधिकार कायद्याशी निगडीत काही कागदपत्रातून हा खुलासा उघड झाला आहे.
द सननं हे खळबळजनक वृत्त दिले आहे. रिपोर्टनुसार, एकूण २३ महिला आणि २८ पुरुषांना ही क्रूर शिक्षा देण्यात आली आहे. आता हे सगळे दहशतीत जीवन जगत आहेत. शरिया कायद्यानुसार ही शिक्षा सुनावली आहे. या आरोपींमध्ये काहींचे वय २५ च्या आसपास आहे. इस्लामिक कायद्यानुसार, लग्नानंतर कुठल्याही परपुरुष अथवा स्त्रीसोबत संबंध ठेवणे हा गुन्हा आहे. या गंभीर गुन्ह्यासाठी कडक शिक्षा देण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार ही शिक्षा अत्यंत क्रूर मानली जात आहे. ज्या व्यक्तीला ही शिक्षा सुनावली गेली आहे. त्याला सर्वात आधी एका सफेद कपड्यात बांधले जाते. त्यानंतर त्याला कमरेपर्यंत जमिनीखाली गाडले जाते. त्यानंतर त्याच्यावर दगडं मारली जातात जोपर्यंत तो मरत नाही. या क्रूर शिक्षेला अनेकदा खूप तास लागतात. शिक्षा मिळालेल्या आरोपीला तडपून तडपून मारलं जातं. इराणमध्ये या शिक्षेसाठी निश्चित तारीख दिली जात नाही. प्रशासन त्यांच्या सोयीनुसार आरोपीला शिक्षा देते.
पहिल्यांदाच शिक्षेचा रेकॉर्ड'द सन'ला नॅशनल कौन्सिल ऑफ रसिज्टेंस ऑफ इराणचा हा रेकॉर्ड मिळाला आहे. ही पहिलीच वेळ आहे ज्यात दगडांनी मारून मृत्यूदंड देण्याच्या शिक्षेबाबत माहिती समोर आली आहे. रिपोर्टमध्ये शिक्षा मिळालेल्या आरोपींची नावे आणि वय सर्व माहिती देण्यात आली आहे. १९७९ च्या क्रांतीनंतर इराणमध्ये अशाप्रकारे क्रूर शिक्षा देण्याच्या परंपरा सुरू झाली होती. मृत्यूदंडाची शिक्षा देणाऱ्यांमध्ये जगात इराणचा पहिला नंबर लागतो.