छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जशपुर येथील एका पतीने आपल्याच पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पतीला दारुचे व्यसन होते. यामुळे या दोघांत नेहमी वाद होत होते. दोन दिवसापूर्वी पती रात्री उशीरा दारुच्या नेशेत घरी आला, यावेळी पतीने पत्नीकडे शारीरीक संबंधाची मागणी केली. पत्नीने नकार दिला. यावेळी रागाने पतीने मारहाण करण्यास सुरुवात केली. पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टजवळ मारण्यास सुरुवात केली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.
चोरी प्रकरणात संशयिताला जामीन मंजूर, कुडचडे पाेलिसांनी केला होता गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बागिचा पोलीस स्टेशन हद्दीतील रौनी गावातील शंकर राम याने दारुचे सेवन केले. यानंतर पतीने पत्नी आशाबाईंशी शारीरिक संबंधाची मागणी केली, पण तिने यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झाले. दोघांमधील वाद इतका वाढला की आशाबाईंनी आत्महत्या करण्याच्या इराद्याने विहिरीत उडी घेतली. यानंतर शंकर राम यांनीही विहिरीत उडी घेतली. शंकरने पत्नी आशाला विहिरीतून बाहेर काढले. त्यांना विहिरीतून बाहेर काढल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद सुरू झाला.
यावरून पती शंकर संतापला आणि त्याने पत्नी आशाबाईंना मारहाण करण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेत पती शंकर याने पत्नीसोबत क्रौर्याची परिसीमा ओलांडली. पत्नीच्या प्रायव्हेट पार्ट जवळ मारहाण सुरू केली. आरोपी शंकर पत्नीला मारहाण करत होता. अखेर पत्नी आशाबाईंचा मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी शंकर रात्रभर मृतदेहाजवळ बसून होता. सकाळी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. आरोपी शंकर हा पत्नीसोबत एकटाच राहत होता आणि दोघांनाही अपत्य झाले नव्हते.
या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपी शंकरने अगोदर पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पत्नीने विहिरीत उडी मारल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. जेव्हा त्याने पत्नीला विहिरीतून बाहेर काढले तेव्हा ती पुन्हा भांडू लागली. पत्नीने स्वतःला मारहाण करुन घेतल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी कडक चौकशी केली असता आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने पत्नीला मारहाण करून ठार केल्याची कबुली दिली आहे.