शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

Ananya Panday, Aryan Khan Drug Case:आर्यन खानला ड्रग्ज कोण पुरवायचा त्याचे नाव समजले; अनन्या पांडेनेच एनसीबीला सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 3:44 PM

Ananya Panday, Aryan Khan Drug Case: एनसीबीने या तरुणाला मालाड येथून ताब्यात घेतले आहे. आता त्याची चौकशी करून अनन्याला सोमवारी प्रश्न विचारले जाणार आहेत.

मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Case) आर्यन खानमुळे (Aryan Khan) बॉलिवूड अॅक्ट्रेस अनन्या पांडेला (Ananya Panday) एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांपासून अनन्या पांडेची सहा तास चौकशी करण्यात आली आहे. आता पुन्हा तिला सोमवारी चौकशीला बोलविण्यात आले आहे. यामागे तिने मोबाईलमधील चॅट आणि कॉन्टॅक्ट डिलीट केल्याचा संशय आहे. अनन्याने एनसीबीला आर्यन खानला कोण ड्रग्ज पुरवते त्याची माहिती दिली आहे. 

अनन्याने कोणत्यातरी सेलिब्रिटीचा नोकर (House-Help) हे ड्रग्ज पुरवतो, असे एनसीबीला सांगितल्याचे समजते आहे. आर्यन खानला ड्रग्ज पुरविणाऱ्या व्यक्तीला आपण ओळखते असे तिने एनसीबीला सांगितले आहे. शनिवारी समोर आलेल्या मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, एनसीबीने 24 वर्षांच्या एका हाऊस हेल्परची चौकशी केली आहे. हा तरुण एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी काम करतो. हा तोच तरुण आहे जो कथितरित्या अनन्याच्या सांगण्यावरून आर्यनला ड्रग्ज देत होता. एनसीबीने या तरुणाला मालाड येथून ताब्यात घेतले आहे. आता त्याची चौकशी करून अनन्याला सोमवारी प्रश्न विचारले जाणार आहेत.

 

तर अनन्या पांडेलादेखील अटक होऊ शकते...आर्यन खानला एनसीबीने 2 ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवरून ताब्यात घेतले होते. त्याच्यासह अन्य 8 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. नंतर त्यांना अटक करण्यात आली. आर्यन खानला 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जर सोमवारपर्यंत एनसीबीला ठोस पुरावे सापडले तर अनन्या पांडेला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातमी....

Ananya Panday: चौकशीला जाण्यापूर्वी अनन्या पांडे मोठा 'गेम' खेळली; एनसीबी बुचकळ्यात पडली

Aryan Khan Drug Case: अनन्या पांडे म्हणते गांजाचे चॅट ही तर मस्करी!

 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानAnanya Pandeyअनन्या पांडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी