शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

बाचाबाचीतून दगडाने ठेचले; मुखेड तालुक्यातील वाहन चालकाच्या खुनाचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 9:44 PM

Murder Case : याप्रकरणी हेळंब येथील दाेघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.  

ठळक मुद्देबालाजी शेषेराव बनसाेडे (३५) हे पीकअप वाहन चालवून आपला उदरनिर्वाह चालवित होते. ते सध्याला उदगीर शहरात वास्तव्याला हाेते.

लातूर : नांदेड जिल्ह्यातील बिहारीपूर (ता. मुखेड) येथील एका वाहनचालकाचा वलांडी (ता. देवणी) शिवारात दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना १६ जून राेजी घडली हाेती. याबाबत देवणी पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, या खून प्रकरणाचा तीन आठवड्यानंतर उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी हेळंब येथील दाेघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पाेलिसांनी सांगितले, बालाजी शेषेराव बनसाेडे (३५) हे पीकअप वाहन चालवून आपला उदरनिर्वाह चालवित होते. ते सध्याला उदगीर शहरात वास्तव्याला हाेते. १६ जून राेजी दुपारी निलंगा येथे भाडे घेवून गेले हाेते. सायंकाळच्या सुमारास उदगीरकडे येत असताना वालांडी शिवारात त्यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला हाेता. वलांडीपर्यंत आहे, तासाभरात घरी येताे, असे कुटुंबीयांना बालाजी बनसाेडे यांनी आपल्या माेबाईलवरुन सांगितले हाेते. मात्र, त्यानंतर त्यांचा आणि कुटुंबीयांचा संकर्प तुटला. रात्रभर ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांना घातपाताचा संशय आल्याने त्यांनी शाेधाशाेध केली असता, वलांडी शिवारात सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी देवणी पाेलीस ठाण्यात प्रारंभी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. अज्ञातांनी त्यांचा खून करुन वाहनही पळविले हाेते. याबाबत पाेलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. तीन आठवड्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे हेळंब येथील विकास रघुनाथ सूर्यवंशी (२९) आणि ज्ञानेश्वर भारत बाेरसुरे (२१) या दाेघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. पाेलिसी खाक्या दाखवताच दाेघांनीही खुन केल्याची कबुली दिली.

हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजनान भातलवंडे, पाेलीस निरीक्षक कामठेवाड, सपाेनि. सूधीर सूर्यवंशी,  पाेउपनि. संजय भाेसले, सपाेउपनि. खान, राजेंद्र टेकाळे, रामहरी भाेसले, राहुल साेनकांबळे, सदानंद याेगी, याेगेश गायकवाड, सिचन धारेकर, चालक जाधव यांच्या पथकाने केला.

समाेर येउन वाहन अडविले...

आरेापी विकास आणि ज्ञानेश्वर हे देवणी तालुक्यातील हेळंब पाटी येथे सायंकाळच्या सुमारास थांबले हाेते. उदगीरकडे जायचे आहे, म्हणून त्यांनी रस्त्यावर आडवे येत चालक बालाजी बनसाेडे यांचे वाहन अडविले. याच कारणावरुन त्यांच्यात आणि चालक बालाजी बनसाेडे यांच्यात वाद झाला. यातूनच आम्ही डाेक्यात दगड घालून चालकाला गंभीर जखमी केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मग उचलून वलांडी शिवारातील शेताच्या बांधालगत टाकून दिले. त्यानंतर माेबाईल, ओळखपत्र, पाॅकिट व वाहन घेवून फारार झालाे, अशी कबुली आराेपींनी दिली आहे. दरम्यान, या खूनाच्या घटनेला अखेर वाचा फुटल्याने दाेघांच्या मुस्क्या आवळल्यात पाेलिसांना यश आले.

टॅग्स :ArrestअटकDeathमृत्यूPoliceपोलिसlaturलातूर