रीवा : क्रौर्याची परिसीमा पार करणारे दृश्य मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात पाहण्यास मिळाले आहे. जिथे ट्रक चालका असलेल्या प्रियकरने प्रेयसीला ट्रकने चिरडून ठार केले. इतकेच नाही तर प्रेयसीच्या मृत्यूनंतरही आरोपीने तिच्या मृतदेहावर अनेकवेळा ट्रक चालवला. यामुळे मृतदेहाच्या चिंधड्या -चिंधड्या झाल्या आणि मृतदेह विकृत अवस्थेत रस्त्यावर पसरला होता. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले, महिलेचा मृतदेह पंचनामा करण्यासाठी पाठवला आणि आरोपीचा शोध सुरू केला. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
हे प्रकरण रेवाच्या गोविंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छुहिया पर्वताचे आहे. जिथे पोलिसांनी विकृत अवस्थेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यानंतर पोलीस पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर महिलेची ट्रकने चिरडून हत्या केल्याचे समोर आले, त्यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर आरोपीला सतना येथील रामनगर पोलीस स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली. जिल्हा आरोपीला अटक केल्यानंतर या घटनेचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
काय होतं प्रकरण?असे सांगितले जात आहे की, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरचा रहिवासी असलेला ५५ वर्षीय मुनीर एका 35 वर्षीय महिलेसोबत संबंध ठेवल्यानंतर सिधी जिल्ह्यातील रामपूर नाईकीन पोलीस स्टेशन हद्दीतील बागवार येथे भाड्याच्या घरात राहत होता. यादरम्यान मुनीरला त्याच्या एका सहकारी ट्रकचालकासोबत महिलेचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आला, यावरून दोघांमध्ये दररोज वाद होत होते आणि या वादामुळे दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. काल रात्री आरोपी ट्रक चालक महिलेला ट्रकमध्ये बसवून तिच्या घरी सोडणार होता. त्यानंतर रीवा जिल्ह्यातील गोविंदगड पोलीस स्टेशन हद्दीतील छुहिया पर्वताजवळ पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. यामुळे महिला ट्रकमधून खाली उतरली, त्यावर संतापलेल्या ट्रकचालकाने ट्रक तिच्या अंगावर नेला. मात्र, त्यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही. म्हणून आरोपी ट्रक चालकाने अनेकदा ट्रकखाली चिरडले आणि महिलेची निर्घृण हत्या केली.
जीपीएस ट्रेसद्वारे पकडलेअतिरिक्त एसपी शिवकुमार वर्मा यांनी सांगितले की, घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रामपूर नैकिनला त्याच्या घरी पोहोचले असता, घरमालकाने प्रियकर ट्रक चालक आणि मृत प्रेयसीमध्ये झालेल्या वादाची माहिती दिली. पोलिसांनी ट्रक मालकाशी संपर्क साधला असता तो त्याने उचलला नाही. यानंतर ट्रकमध्ये बसवण्यात आलेल्या जीपीएस सिस्टीमचा माग काढून आरोपीचा शोध घेण्यात आला. गुन्हा केल्यानंतर आरोपी सतना जिल्ह्यातील अमरपाटन येथे सापडला होता. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला तेथून अटक केली. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.