काँग्रेस कार्यकर्त्याची तलवारीने वार करून हत्या करणारे पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 02:05 PM2018-10-22T14:05:58+5:302018-10-22T14:16:46+5:30
साकीनाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाचे सुनील दुबे आणि उमेश सिंह, आकाश शर्मा यांच्यासह काही भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
मुंबई - फेसबुक पोस्टच्या वादातून घाटकोपरच्या असल्फा परिसरातील मेट्रो रेल्वे स्थानकाखाली काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे (वय ४५) यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री १.३० वाजताच्या सुमारास मनोज दुबे यांच्यावर तलवार आणि चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोज दुबे हे महादेव मंदिरासमोर मेट्रो स्थानकाखाली रक्तांच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तात्काळ नजीकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.याच वादातून रात्री अडीजच्या सुमारास मनोज दुबे यांच्यावर तलवारी आणि चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. साकीनाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाचे सुनील दुबे आणि उमेश सिंह, आकाश शर्मा यांच्यासह काही भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
काँग्रेस आमदार नसीम खान यांच्या वाढदिवसासंबंधी केलेल्या पोस्टवरुन हा वाद सुरु झाला. एका युवकाने काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. मनोज दुबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पोस्टवरुन टीका करणाऱ्याला समजावले. मात्र, हा फेसबुकवरील वाद विकोपाला जाऊन मनोज दुबे यांची हत्या झाली.
Mumbai: Congress worker Manoj Dubey allegedly killed in Ghatkopar last night. Relative says, "he shared a post on Facebook that Congress will form govt in 2019 on which BJP&Bajrang Dal workers posted rude comments.The altercation led to a fight with swords in which he was killed" pic.twitter.com/4VraCCVE0q
— ANI (@ANI) October 22, 2018
प्रियंका गांधी यांनी देखील या हत्येबाबत खेद नोंदवून फडणवीस सरकारला आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आवाहन केले आहे.
We strongly condemn this barbaric murder of our volunteer Manoj Dube who was killed last night for sharing a post on Facebook that Congress will form govt in 2019,We urge #MumbaiPolice to quickly investigate & put the perpetrators of this crime behind bars. #HappyBirthdayAmitShahpic.twitter.com/UYGus1tRB5
— Priyanka Gandhi (@WithPGV) October 22, 2018
फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून काँग्रेस कार्यकर्त्याचा खून