शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
2
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
3
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
4
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
5
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
6
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
7
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
8
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
9
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
10
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
11
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
12
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
13
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
14
Share Market Live Update : शेअर बाजारात हाहाकार, Sensex १००० अंकांपेक्षा अधिक आपटला; २७९ कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किट
15
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ
16
तुम्ही लढत बसाल, वकील खुश होतील; घटस्फोटाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश काय बोलले?
17
"आपण आपल्या प्रकृतीच्या बाबतीत PM मोदींना विनाकारण ओढलं, प्रार्थना करतो की...'; शाह यांचा खर्गेंवर पलटवार
18
नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद भारतात उमटले; लखनौला शेकडो लोक रस्त्यावर उतरले
19
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
20
अखेर Ashneer Grover यांनी BharatPe सोबतचा वाद सोडवला, काय झाली दोघांमध्ये डील?

प्रवाशाकडून कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केले १७ लाख रुपयांचे तस्करीचे सोने

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 10:11 PM

Goa Crime News : २४ तासाच्या आत गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाºयांनी दुसरी कारवाई करत दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून रविवारी (दि.२१) ४३२ ग्राम पेस्ट पद्धतीने आणलेले तस्करीचे सोने जप्त केले.

वास्को - २४ तासाच्या आत गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाºयांनी दुसरी कारवाई करत दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून रविवारी (दि.२१) ४३२ ग्राम पेस्ट पद्धतीने आणलेले तस्करीचे सोने जप्त केले. कस्टम विभागाच्या अधिकाºयांना चकमा देण्यासाठी त्या प्रवाशाने पेस्टपद्धतीने आणलेले हे सोने तीन कॅप्सूलात भरून गुप्तांगात लवपून तो विमानतळावरून निसटण्याच्या प्रयत्नात होता, मात्र कस्टमअधिका-यांना विमानतळावर एक प्रवासी तस्करीचे सोने आणणार असल्याची माहीती पूर्वीच प्राप्त झाल्याने त्याचा हा बेत फसला. २४ तासाच्या आत दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाºयांनी केलेल्या दोन कारवाईत एकूण १ किलो २५३ ग्राम तस्करीचे सोने जप्त केले असून दोन्ही कारवाईत जप्त केलेल्या सोन्याची एकूण कींमत ५० लाख ५ हजार रुपये असल्याची माहीती प्राप्त झाली. (Customs officials seize smuggled gold worth Rs 17 lakh from passengers)रविवारी दाबोळी विमानतळावर एक प्रवाशी तस्करीचे सोने घेऊन येणार अशी पूर्व माहीती कस्टम अधिकाºयांना मिळताच त्यांनी येथे कडक रित्या सतर्कता ठेवली. दुबईहून दाबोळीवर आलेल्या एअर इंडीया (एआय ९९४) विमानातील एका प्रवाशावर अधिकाºयांना त्याच्या हालचालीवरून संशय निर्माण होताच त्याला बाजूला घेऊन त्याच्याशी कसून चौकशी केली असता त्यांने तस्करीचे सोने आणल्याचे उघड झाले. यानंतर त्याची झडती घेतली असता त्यांने पेस्टपद्धतीने कॅप्सूलमध्ये घालून आणलेले ते सोने गुप्तांगात लपविल्याचे उघड झाले. कस्टम अधिकाºयांनी याप्रकरणात कारवाई करून नंतर कस्टम विभागाच्या १९६२ कायद्याखाली तस्करीचे ते सोने जप्त केले. रविवारी कारवाई करून जप्त केलेल्या त्या तस्करीच्या सोन्याची किंमत १७ लाख ३९ हजार रुपये असल्याची माहीती प्राप्त झाली. दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या सहाय्यक आयुक्त जुलीयेटा फर्नांडीस व संयुक्त आयुक्त एम.एस मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली असून याप्रकरणात अधिक तपास चालू आहे.२४ तासाच्या आत दाबोळी विमानतळावर कस्टम विभागाने तस्करीच्या सोन्याबाबत केलेली ही दुसरी कारवाई आहे. शनिवारी (दि.२०) कस्टम अधिकाºयांनी विदेशीतून आलेल्या एका प्रवाशाकडून ३३ लाख ६ हजार रुपयांचे (८२१ ग्राम सोने) तस्करीचे सोने जप्त केले होते. सलग दोन दिवसात केलेल्या दोन वेगवेगळ््या कारवाईत कस्टम अधिकाºयांनी विदेशातून आलेल्या दोन प्रवाशांकडून एकूण ५० लाख ५ हजार रुपयांचे तस्करीचे सोने (१ कीलो २५३ ग्राम) जप्त केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी