शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

लॉकडाऊनमध्ये सायबर सेलने दाखल केले २५८ गुन्हे, आतापर्यंत ५७ आरोपींना अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 6:35 PM

ठाणे ग्रामीण व गोंदिया नवीन गुन्हे

ठळक मुद्देमहाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २५८ गुन्हे दाखल केले आहेत. टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये  ज्या २५८गुन्ह्यांची  नोंद झाली आहे.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २५८ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.       

टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये  ज्या २५८गुन्ह्यांची  नोंद झाली आहे. त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र (N.C )आहेत. यामध्ये बीड २७, पुणे ग्रामीण २०, मुंबई १७, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली ११, नाशिक ग्रामीण १०, नाशिक शहर १०, जालना ९, सातारा ८, नांदेड ८, परभणी ७, लातूर ७, ठाणे शहर ६, सिंधुदुर्ग ६, बुलढाणा ६, ठाणे ग्रामीण ६, गोंदिया ५,हिंगोली ५,नागपूर शहर ५, नवी मुंबई ५, सोलापूर ग्रामीण ५, अमरावती ४, पुणे शहर ४,  सोलापूर शहर ३, रायगड २, धुळे २, वाशिम १,औरंगाबाद १ (एन.सी) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. 

     

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले, तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ११४ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ९० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. titktok विडिओ शेअर प्रकरणी ६ गुन्हे तर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ५७ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .

          ठाणे ग्रामीणठाणे ग्रामीण जिल्ह्यांतर्गत उत्तन सागरी पोलीस स्टेशनमध्ये अजून एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे ठाणे ग्रामीण जिल्ह्यांतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ६ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने एका कोरोना बाधित व्यक्तीस quarantine करण्यासाठी ऍम्ब्युलन्समधून घेऊन जात असतानाचा विडिओ बनवून ,सदर विडिओ चुकीच्या  माहिती सोबत व्हाट्सअँपद्वारे प्रसारित करून, कोरोना महामारीबद्दल चुकीची माहिती देऊन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला . 

          गोंदियागोंदिया  तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ज्यामुळे आता जिल्ह्यातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ५ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने परिसरातील दुकाने चालू असण्याच्या वेळेबाबत खोटी माहिती पसरवून संबधीत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश चुकीचे आहेत अशा आशयाची पोस्ट्स व्हाट्सअँपद्वारे पसरविली होती . 

   पालकांना विनंती सर्व नागरिकांना आणि विशेष करून ०७ ते १८ वयोगटातील मुलांच्या पालकांना विनंती करते कि, आपले पाल्य ऑनलाईन surfing करताना आपण त्याच्यावर विशेष लक्ष ठेवावे . जर ते कोणाशी ऑनलाईन चॅट करत असतील तर समोरची व्यक्ती कोण आहे याची  माहिती करून घ्या ,तुमच्या फोन किंवा घरातील लॅपटॉप व कॉम्पुटरद्वारे कोणत्या वेबसाइट्सवर क्लीक करत आहेत,किंवा  काय वेबसाईट browse करत आहेत यावर लक्ष ठेवा .तसेच स्वतः सुद्धा पोर्नोग्राफिक वेबसाईट शोधून त्यावर क्लिक करणे टाळा कारण सध्या चाईल्ड पोर्नोग्राफीचे बघण्याचे  प्रमाण वाढत आहे . आपल्या पाल्यास कोणी ऑनलाईन धमकावत तर नाही याची खात्री करा.  तसेच आपण आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स व त्यांचे पिन क्रमांक आपल्या पाल्यास देण्याचे टाळावे ,तसेच काही ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही त्यांच्या  बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा . जर कोणत्याही पालकास असे निदर्शनास आले कि आपले पाल्य हे कोणत्यातरी ऑनलाईन fraud किंवा ऑनलाईन रॅकेट मध्ये अडकलेत किंवा चाईल्ड पोर्नोग्राफीचे शिकार बनलेत तर घाबरून न जाता आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रार नोंद करा व त्याची माहिती www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर  द्यावी. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रArrestअटक