शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

लॉकडाऊनदरम्यान सायबर सेलची उल्लेखनीय कारवाई सुरूच, २४२ गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 7:57 PM

काल १९/०४/२०२० रोजी महाराष्ट्रात फक्त एकाच नवीन गुन्ह्याची नोंद झाली असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे. 

ठळक मुद्देअमरावती शहरांतर्गत फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये काल एका नवीन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी  ८२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर अशा गुन्हेगार व समाजकंटक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी सर्व आयुक्त व जिल्हा पोलीस प्रशासना बरोबर  समन्वय साधून काम करीत आहे. महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. या लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सायबरने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. काल १९/०४/२०२० रोजी महाराष्ट्रात फक्त एकाच नवीन गुन्ह्याची नोंद झाली असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे. 

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण २४२ गुन्ह्यांची (ज्यापैकी ८ N.C आहेत) नोंद १९ एप्रिल २०२० पर्यंत झाली आहे .त्यामध्ये बीड २७, पुणे ग्रामीण १९, मुंबई १७, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली १०, नाशिक ग्रामीण १०, जालना ९, सातारा८, नाशिक शहर ८, नांदेड ७, परभणी ७, ठाणे शहर ६, सिंधुदुर्ग ६, नागपूर शहर ५, नवी मुंबई ५,सोलापूर ग्रामीण ५, लातूर ५, बुलढाणा ५, अमरावती ४, पुणे शहर ४, गोंदिया ४, ठाणे ग्रामीण ४, सोलापूर शहर ३, रायगड २, हिंगोली २, वाशिम १,धुळे १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. 

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्स अ‍ॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ११० गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी  ८२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४१ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत ४७ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .अमरावती शहरांतर्गत फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये काल एका नवीन गुन्ह्याची नोंद करण्यात आली ,ज्यामुळे अमरावती जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन सुरु असताना देखील दोन धर्मात तेढ निर्माण होऊन, परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा मजकूर असणाऱ्या पोस्ट्स टाकल्या होत्या. 

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, कोरोना महामारीच्या संबंधित कोणत्याही माहितीची,सरकारी माहितीसोबत सत्यता पडताळून बघितल्या शिवाय कोणाला तोंडी किंवा लिखित स्वरूपात किंवा सोशल मिडियावर (फेसबुक,इंस्टाग्राम ,व्हाट्सअँप इत्यादी) शेअर करू नये. अशा खोट्या व चुकीच्या पोस्ट्स , फॉरवर्ड मेसेजेस , फोटोज किंवा व्हिडिओ पाठविणाऱ्यांवर सरकारी आदेशांचे व नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला जाऊ शकतो .जर कोणी या कोरोना महामारीबाबत खोटी किंवा चुकीची माहिती ,मेसेजेस ,फोटोज ,विडिओ तुम्हाला पाठवत असतील तर त्याबाबत तुम्ही तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवू शकता तसेच या गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website ) पण द्यावी .

महाराष्ट्र सायबर सर्व नागिरकांना आवाहन करते की, कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या whatsapp किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media)पसरवू नयेत,व त्यांच्यावर विश्वास ठेवू नये.तसेच काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे व कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये.  

 

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसTwitterट्विटरFacebookफेसबुकArrestअटकMaharashtraमहाराष्ट्र