मुंबई : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर ने राज्यात २०१ तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २६ गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
महाराष्ट्र सायबर विभाग टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये २०१ गुन्हे १४ एप्रिल २०२० पर्यंत दाखल झाले आहेत . त्यामध्ये सर्वाधिक २६ गुन्हे बीड जिल्ह्यात नोंदविले आहेत. कोल्हापूर १५, जळगाव १३, पुणे ग्रामीण ११, मुंबई १०, सांगली १०,जालना ९, नाशिक ग्रामीण ८ ,सातारा ७, नांदेड ७, परभणी ७, नाशिक शहर ६, नागपूर शहर ५, सिंधुदुर्ग ५ ,ठाणे शहर ५, बुलढाणा ४, पुणे शहर ४, लातूर ४, गोंदिया ४, सोलापूर ग्रामीण ५, सोलापूर शहर ३. नवी मुंबई २, उस्मानाबाद २, ठाणे ग्रामीण १,धुळे १यांचा प्रामुख्याने समावेश आहे .
या सर्व गुन्ह्यांचे विश्लेषण असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ९९ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ६६ गुन्हे दाखल करण्यात आले. Titktok विडिओ शेअर प्रकरणी ३ तर ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ३७ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत ३७ आरोपींना अटक केली आहे .
नवी मुंबई येथील कोपरखैरने ह्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एका अज्ञात इसमाने भारतीय झेंड्याचा अवमान करणारे छायाचित्र इंस्टाग्राम वर अपलोड करून भारत देशाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे.त्याबद्दल अज्ञात इसमा विरुद्ध कोपरखैरने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.