नवी दिल्ली - बेहिशेबी मालमत्तेप्रकरणीकर्नाटककाँग्रेसचे 'संकटमोचक' अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) यांनाअटक करण्यात आली आहे. त्यानंतर कोर्टाने शिवकुमार यांना १२ सप्टेंबरपर्यंत ईडीची कोठडी ठोठावली होती. त्यानंतर आज पुन्हा दिल्ली कोर्टाने त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.
डी. के. शिवकुमार यांना 2018 मध्ये ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी ईडीने काढलेली नोटीस रद्द करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयायात धाव घेत अर्ज दाखल होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांना ३ सप्टेंबरला ईडीने अटक केली आहे. दरम्यान, याविषयी बोलताना डी. के. शिवकुमार यांनी मागील दोन वर्षात माझ्या आईच्या नावे असणारी संपत्ती वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी बेनामी असल्याचे सांगत जप्त केल्याचा आरोप केला आहे.