केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीची राजधानी सिल्वासा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नरौली विस्तार येथील एका इमारतीत राहणारी तीन वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात शेजारी राहणाऱ्या एका तरूणानं तिच्यावर लैगिक अत्याचार करून चाकू मारून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आली. इतकंच नाही तर त्या तरूणानं त्या मुलीचं मृत शरीर आपल्या अपार्टमेंटच्या खिडकीतून खाली फेकलं. त्यानंतर त्यानंत पुन्हा त्या मुलीचं मृत शरीर एका बॅगेत घालून रस्त्याच्या बाजूला फेकल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांना जबर धक्का बसला होता. त्यांनी या धक्क्यातच आत्महत्या करून आपलंही आयुष्य संपवलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरौली विस्तार येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील ३ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांच्या आसपासच्या परिसरात तिचा शोध घेतला. परंतु ती मुलगी सापडली नाही. तीन चार तासांच्या शोधानंतरही ती मुलगी सापजली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी याची पोलिसांत तक्रार दाखल केली. ही घटना गंभीरतेनं घेत पोलिसांचं एक पथक त्यांच्या राहत्या ठिकाणी पोहोचलं आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला. दरम्यान, ती चिमुरडी दुपारी अन्य मुलींसह खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसंच ती आपल्या घरापासून दूरही गेली नसल्याचं पोलिसांना तपासादरम्यान समजलं. यावेळी पोलिसांनी ते कुटुंब राहत असलेल्या इमारतीतील सर्व घरांची झडती घेतली. पोलिसांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातही झडती घेतली परंतु यादरम्यान, त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. परंतु त्याच्या घरातील बाथरूमच्या खिडकीची काच फुटली होती. यावरून पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी अपार्टमेंटच्या सर्व बाजूंना झडती घेतली. यावेळी त्यांना रस्त्यावर एक बॅग आढळून आली. या बॅगेत त्या चिमुरडीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपास केल्यानंतर त्या मुलीवर लैगिक अत्याचार करून तिच्यावर चाकूनं अनेकदा वार करत हत्या केल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी घेतलं ताब्यातपोलिसांना यापूर्वीच शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर संशय असल्यानं त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. याच दरम्यान, चिमुरडीच्या वडिलांना हे दु:ख सहन झालं नाही आणि त्यांना जबर धक्का बसला. यानंतर त्या चिमुरडीचे वडील फिनाईल प्यायले. कुटुंबीयांना याची माहिती मिळतात त्यांनी तातडीनं तिच्या वडिलांना रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.