- शौकत शेखडहाणू : पालघर जिल्ह्यात दमण दारु , , जुगार, काळा गूळ, गुटखा पकडून गुन्हेगारांची साखळी पालघर पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने उद्ध्वस्त केली असली तरी सध्या शहरामध्ये सट्टेबाजी जोरात सुरु आहे. सागर नाका येथील काल्या नावाचा इसम आयपीएल क्रिकेट मॅचवर लाखोंचा सट्टा घेत आहे. या प्रकारामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी, बेरोजगार तरुण, आजी -माजी नगरसेवक, शिक्षक, व्यापारी, उद्योजक यामध्ये गुंतले आहेत. दरम्यान या बाबत सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी यांनी लोकमतला सांगितले.सध्ये सर्वत्र आयपीएल क्रि केट सामन्यांवर क्रिकेट सट्टा जुगाराला ऊत आला आहे. तर क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने गल्लाबोळामध्ये क्रिकेट सट्टा घेणारे बुकी तयार झाले आहेत. शहरामध्ये क्रिकेटवर सट्टा घेणाºया बुकिंची संख्या डझनभर झाली असली तरी सट्टा घेणाºया मुख्य बुकी भाऊ हा उमरगाव येथुन सुत्रे हालवित आहे. दररोज कालिया नावाचा बुक्की ही साखळी चालवत आहे. स्थानिक पोलीसांना या बाबतची सर्व कल्पना देऊनही कोणतीही कारवाई होत नाही. संध्याकाळी बुकी गुप्त ठिकाणी निघून जातात. त्यानंतर सकाळी पान टपरी, हॉटेल, स्टेशनरी दुकानातुन पैशाचा व्यवहार होतो. महाविद्यालयीन विद्यार्थी , बेरोजगार तरुण त्याकडे आकर्षित होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर जुगारासाठी उसनवारी करुन पैसे उभे केले जात असल्याने कौटुंबिक वादाचे प्रकार वाढले आहेत.गौरवसिंहाकडून अपेक्षाबेरोजगार, तरुण वर्ग झटपट पैसे कमवण्याच्या नादात पालकांच्या नकळत घरातील पैसे लावून हारत आहेत तर हरलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी उसनवारी करुन पैसे घेऊन सट्टा खेळत आहेत.पोलीस अधिक्षकांचे भरारी पथक छापा टाकेल या भितीने सट्टा बाजारी रोज आपली ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरत आहे.
डहाणूतील क्रिकेट सट्टा बुकींवर कुणाचे वरदहस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 12:40 AM