- शौकत शेखडहाणू - सध्या देशभरात सुरु असलेल्या आयपीएल मॅचवर डहाणूत मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरु असल्याचे वृत बुधवाार लोकमतने प्रसिद्ध करताच डहाणूतील डझनभर बुकी व त्यांचे पंंटर भूमिगत झाले आहेत. बुधवारी दिवसभर लोकमतचे वृत्त सोशल मिडीयावर फिरत आसल्याने क्रि केट सट्टा बुकिमध्ये खळबळ उडुब आज मॅच सुरु होण्यापूर्वीच उमरगाव येथे पळून गेले.डहाणू शहरात आयपीएल मॅचवर दर रोज ३० लाखाचा जुगार खेळला जातो. दोन तीन मुख्य बुकीच्या बरोबर दुसरे डझनभर किरकोळ बुकी या जुगारात गुंतले असल्याने डहाणूत नाक्या नाक्ययवर कोण किती जिंकला , कोण किती हरला याची चर्चा होते झटपट पैसे कमावण्याच्या नादात पालकांना नकळत कर्ज उसनवारीने पैसे क्रिकेट सट्ट्यावर लावले जात असतात. प्रत्येक चेंडूवर जुगार खेळ ला जात असल्याने दिवसभर तरुण त्यात गुंतले जात होते.दरम्यान आज लोकमत ने सट्टा बुकींची बातमी प्रसिद्ध केल्याने अनेक बुकीचे मोबाईल सकाळपासुन नॉट रिचेबल झाले होते. बहुसंख्य बुकींनी आपल्या बगलबच्च्यांसह उमरगाव येथे मुक्काम ठोकल्याची चर्चा होती. त्यामुळे येथे सट्टेबाजांची चांगलीच गोची झाली.
डहाणूतील बुकी पळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 12:05 AM