भिवंडी : नवºयापासून विभक्त राहणाºया महिलेशी वर्षभरापासून प्रेमसंबंध जोडून शारीरिक भूक भागविणाºया प्रियकराने लग्नास नकार दिल्याने, संतापलेल्या प्रेयसीने धारदार विळ्याने प्रियकराच्या गुप्तांगावर वार केल्याची खळबळजनक घटना केजीएन चौक, नवीवस्ती येथे शनिवारी मध्यरात्री घडली आहे. फकरु फजदुरु रहेमान खान (३0) असे जखमी झालेल्या वर्षीय प्रियकराचे नाव आहे.
गेल्या वर्षभरापासून फकरुचे शेजारी राहणाºया ३0 वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध जुळले होते. शनिवारी रात्री फकरु तिच्या घरी झोपण्यासाठी गेला होता. या वेळी महिलेने त्याच्याकडे लग्नाची विचारणा केली. मात्र तो टाळाटाळ करू लागल्याने दोघांमध्ये वाद झाला. या रागातून तिने धारदार विळा त्याच्या गुप्तांगावर मारला.
शेजाऱ्यांनी जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून, या हल्ल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.गेल्या वर्षभरापासून तिच्याशी प्रेमाचे नाटक करून शारीरिक उपभोग घेणाºया फकरु विरोधातदेखील पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.